kajol B'Day Special Instagram
मनोरंजन

kajol B'Day: अजय देवगणने काजोलच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडिओ

kajol B'Day Special: अजय देवगणने काजोलला तिच्या वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. काजोलला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी काजोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पती अजय देवगणनेही काजोलला व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. (kajol B'Day Special news)

अजय देवगणने (Ajay Devgn) रात्री ठीक 12 वाजता इंस्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काजोलचे एक-एक फोटो दिसत होते. व्हिडिओची (Video) सुरुवात फोन कॉलने होते. मोबाईलवर काजोलचा फोन येत असल्याचे दिसत आहे आणि फोन रिसिव्ह करण्यासाठी फोनची स्क्रीन सरकताच अचानक काजोलचे अनेक फोटो दिसू लागतात.

या फोटोंमध्ये (Photo) काजोल लाल रंगाच्या थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. अजयने त्याच्या पोस्टसोबत एक गोंडस कॅप्शन देखील दिले आहे. त्याने लिहिले की, 'जेव्हा ती कॉल करते, तेव्हा मी कॉल मिस करत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय काजोल. अजय देवगणची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे. कमेंट करताना चाहते अजय देवगणला आयडॉल हसबंड म्हणत आहेत.

काजोल आणि अजयच्या लग्नाला 23 वर्षे झाली
काजोल आणि अजय 1999 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना न्यासा आणि युग दोन मुले आहेत. अजय आणि काजोल पहिल्यांदा 'हस्टल' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यांच्या पहिल्या भेटीच्या 4 वर्षानंतर दोघांनी लग्न केले. अलीकडेच त्यांच्या लग्नाला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत, जो त्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT