बॉलिवुडमधील सिंघम अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या येणाऱ्या 'रनवे 34' या चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आहे. आता त्याचा रॅपही नेटकऱ्यांना आवडत आहे. या चित्रपटात अभिनयाबरोबच अजयचा चित्रपटाच्या दिग्दर्शनातही महत्वाचा वाटा आहे. या चित्रपटात त्याने एक रॅप गायला आहे. ज्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. त्याच्या 'रनवे 34' या चित्रपटासाठी या रॅपची निर्मीती करण्यात आली आहे.
अजयने (Ajay Devgn) यशराज मुखाटे सोबत हा रॅप बनवला आहे. 'जलाया तो नही न' असे या रॅपचे नाव आहे. यामधे अजयचे काही डायलॉगही नेटकऱ्यांना ऐकायला मिळतील. यशराजने शेअर केलेल्या या व्हिडिओमधे (Video) अजय त्याला एक रनवे 34 साठी एक ट्रॅक बनवायला लावतो. त्यावर यशराज त्याला म्हणतो ठीक आहे सर आपण चित्रपटामधील (Movie) काही डायलॉग घेऊ आणि त्यावर रील्स बनवू त्यावर अजय त्याला म्हणतो 'ये थ्रीलर फिल्म है इसलिये मै जैसा कहता हू वैसा करो.' नंतर यशराज यावर एक गाणं बनवतो ज्यामधे तो अजय देवगणचा 'जलाया तो नही न' हा डायलॉग वापरतो.
अजयचा नवीन चित्रपट हा दोहा ते कोच्ची जाणाऱ्या विमानात घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रकुल प्रित मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अमिताभ बच्चन बोमन इराणी, कैरी मिनाती हे सुद्धा चित्रपटात आहेत. अंगिरा धर या चित्रपटात प्रेक्षकांना एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. आकांक्षा सिंग चित्रपटात अजयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. रनवे 34 हा चित्रपट 29 एप्रिलला चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.