Ajay devgan canva
मनोरंजन

अजय देवगनने केली नव्या चित्रपटाची घोषणा

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगणने (Ajay devgan) 2021 साठी आपला नवीन प्रकल्प जाहीर केला आहे. अजय साऊथचा (south movie) सुपरहिट सिनेमा नंदीच्या (Naandhi) हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

Dainik Gomantak

बॉलिवूड (bollywood) अभिनेता अजय देवगणने (ajay devgan) 2021 साठी आपला नवीन प्रकल्प जाहीर केला आहे. अजय साऊथचा (south movie) सुपरहिट सिनेमा नंदीच्या (Naandhi) हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू (telugu) भाषेत आला होता आणि तो सिनेमा मोठा निर्माता आणि डिस्ट्रीब्यूर दिल राजू (Dil Raju) यांनी बनवला होता. दिल राजूने अलीकडेच ‘वकील साहब’ हा चित्रपट बनविला होता जो अमिताभ बच्चन यांच्या ‘पिंक’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. या सिनेमात साउथचा सुपरस्टार पवन कल्याणने काम केले होते.याशिवाय अजयचा भुज हा चित्रपटही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारला (Disney Hotstar) 112 कोटी रुपयांना विकला आहे, परंतु सध्याच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.(Ajay Devgan announces new film this superhit film of South will be remake )

तेलुगू सिनेमाचा स्टार अल्लारी नरेशने (Allari Naresh) नंदी या चित्रपटात धमाकेदार अभिनय केला आहे. या चित्रपटामध्ये एका माणसाची कहाणी आहे ज्याच्यावर तुरुंगातमध्ये अत्याचार केले जातात आणि मग तो स्वतःचा युद्ध कसा लढतो. अजय देवगणला हा चित्रपट इतका आवडला आहे की त्याने हिंदीमध्ये रीमेकच विकत घेतला आहे आणि आता 2021 मध्ये प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. अजय देवगण सोबत दिल राजू, कुलदीप राठोड आणि पराग देसाई हेदेखील याची निर्मिती करणार आहेत. पराग देसाई हे अजय देवगणचे प्रचारक आहेत आणि जवळजवळ ते अनेक वर्षांपासून त्यांच्याबरोबर काम करत आहेत.

अजय देवगनच्या मैदान या चित्रपटाचे शूट अद्याप थोडेसे शिल्लक आहे. मुंबईतील तौकते वादळामुळे त्याचा सेट खराब झाला. ज्यामुळे हा सेट पुन्हा चर्चेत आला. बोनी कपूर हे अजयच्या या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.याशिवाय अजयचा भुज हा चित्रपटही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट ओटोटी डिज्नी हॉटस्टारला 112 कोटी रुपयांना विकला आहे, परंतु सध्याच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.चित्रपटाचे बजेट सुमारे 80 कोटी आहे. याशिवाय अजय देवगण देखील ओटीटीमधून पदार्पण करणार आहे आणि या प्रॉडक्टला रुद्र असे नाव देण्यात आले आहे. अजयनेही यासाठी शूटिंग सुरू केली आहे. अजय देवगन अमिताभ बच्चन यांच्यासमवेत एक चित्रपट करत आहेत. ज्याचे ते स्वत: दिग्दर्शक आहेत. हे पाहता अक्षय कुमार नंतर तो सर्वात व्यस्त कलाकार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prime Minister Dance: दमादम मस्त कलंदर... शिबानी कश्यपच्या गाण्यावर पंतप्रधानांचा भन्नाट डान्स, रंगली अविस्मरणीय मैफल Watch Video

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT