Aishwarya Rajnikanth  Dainik Gomantak
मनोरंजन

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

ऐश्वर्या रजनीकांत ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.

दैनिक गोमन्तक

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. काही काळापूर्वी ती अभिनेता धनुषपासून वेगळी झाली. त्याचबरोबर आता ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे प्रकाशझोतात आली आहे. ऐश्वर्या रजनीकांत हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव असून आता ती बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. ऐश्वर्यानेच ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

ऐश्वर्या रजनीकांत ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. तिने अनेक चित्रपटांचे (Movies) दिग्दर्शन केले असून आता ती 'ओ साथी चल' या बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. याबाबत माहिती देताना तीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

या पोस्टरसोबत ऐश्वर्या रजनीकांतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या आठवड्याची यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकली नसती. हिंदीतील माझा पहिला दिग्दर्शित वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट 'ओ साथी चल' जाहीर करताना आनंद होत आहे. @meenuaroraa9 @c9Pictures @archsda द्वारे निर्मित ही एक विलक्षण खरी प्रेमकथा आहे. मात्र, या चित्रपटाशी संबंधित जास्त माहिती अद्याप समोर आलेली नाही. ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष (Dhanush) या वर्षी जानेवारीत वेगळे झाले. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT