Bollywood actress Aishwarya Rai Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

ऐश्वर्या राय बच्चन खरोखरच गर्भवती आहे का? पाहा व्हिडीओ

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) अलीकडेच मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबईच्या एका खासगी विमानतळावर दिसली आणि तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ऐश्वर्याचा काळा ड्रेस. त्याचबरोबरचाहते असा दावा करत आहेत की, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ऐश्वर्या राय बच्चन गर्भवती आहे?

ऐश्वर्या गर्भवती असल्याच्या बातम्या गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर येत आहेत. अलीकडेच अफवांना सुरुवात झाली जेव्हा ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबईच्या खाजगी विमानतळावरुन बाहेर पडताना दिसली. अभिनेत्रीने काळा रंगाचा लूक परिधान केला होता आणि नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तिच्या लूकवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, "ती गर्भवती आहे असे दिसते - ही चांगली बातमी असेल". त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली, 'तिचा बेबी बंप आता स्पष्टपणे दिसत आहे.' तिसऱ्या चाहत्याने कमेंट केली, बच्चन कुटुंबात लवकरच चांगली बातमी येत आहे असे दिसते.

अलीकडेच, ऐश्वर्या रायचा आगामी चित्रपट 'पोन्नीयन सेल्वन' च्या सेटवरील तिचा फोटो लीक झाला. या चित्रात ती राणीच्या लूकमध्ये दिसत होती. अभिनेत्रीचे शाही रूप पाहून तिचे चाहते खूप आनंदी झाले. लीक झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की ऐश्वर्या राय गुलाबी रंगाच्या कांजीवरम साडीसह जड दागिन्यांमध्ये दिसत आहे. त्याच वेळी, तिच्या हातात फर सारखे काहीतरी दिसते. चित्रपटाचे क्रू मेंबर अभिनेत्रीच्या आसपास दिसू शकतात, जे शॉटची तयारी करत आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या एका खास गाण्याच्या शूटिंग दरम्यानचे हे त्याचे फोटो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजूण येथे कंस्ट्रक्शन साइटवरुन पडून पश्चिम बंगालच्या मजूराचा जागीच मृत्यू!

Goa Vacation: बस, ट्रेन, विमान! सुट्टीत पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी कोणता पर्याय चांगला, किती रुपये मोजावे लागतील?

Harvalem Panchayat: कोण बाजी मारणार? हरवळे पंचायत निवडणूकीवर सर्वांचे लक्ष

Borim News: गोव्यासाठी गुड न्यूज! बोरी पुलासाठी भारत सरकारकडून अधिसूचना जारी; लवकरच होणार पायाभरणी

Goa Drugs News: गोव्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटसंबंधी केरळच्या युवकास अटक; आणखी परप्रांतीय सापडण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT