Aindrila Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Aindrila Sharma shocking death: 'या' अभिनेत्रीची मृत्यूसोबतची तिसरी लढाई ठरली अपयशी

जीवन-मरणाच्या लढाईत हार पत्करत बंगाली अभिनेत्रीने रविवारी दुपारी घेतला अखेरचा श्वास

Ganeshprasad Gogate

जीवन-मरणाच्या तिसऱ्या लढाईत हार पत्करत बंगाली अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा यांनी रविवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. 1 नोव्हेंबर रोजी ब्रेन स्ट्रोक आल्याने ऐंद्रिला शर्मा यांना कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 24 वर्ष होते. 20 दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

2015 मध्ये 11वीत शिकत असताना त्यांना पहिल्यांदा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तिच्या फुफ्फुसात ट्यूमर होता. कॅन्सरशी लढा देत तिने अभिनयाचे काम सुरू ठेवले होते. मात्र 1 नोव्हेंबर रोजी ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना पुन्हा हावडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १४ नोव्हेंबरपासून ऐंद्रिलाची प्रकृती ढासळू लागली. एंड्रिलाला ब्रेन हॅमरेज झाला होता. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (19 नोव्हेंबर) रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, हा धक्का ऐंद्रिलाला सहन झाला नाही.

ऐंद्रिला गेल्या २४ तासांपासून डॉक्टरांच्या काटेकोर देखरेखीखाली होती.अखेर रविवारी दुपारी 12:59 वाजता अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. या 24 वर्षांच्या तरुण अभिनेत्रीने दीर्घ संघर्षानंतर अखेर हार मानली. ऐंद्रिला शर्माचे घर मुर्शिदाबादच्या बहरामपूर येथील इंद्रप्रस्त भागात आहे. तिचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. ऐंद्रिलाच्या मृत्यूने टॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर अभिनेत्यांनी शोक व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT