Sunidhi Chauhan Insta/ sunidhichauhan
मनोरंजन

HBD Sunidhi: हटके आणि स्टायलीश सुनिधीचं 18व्या वर्षी पडलं चुकीचं पाऊल

सुनिधीचे वडील थिएटर आर्टिस्ट असल्याने तिने लहानपणापासूनच स्टेज शो करायला सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

मुंबई: प्रसिद्ध पार्श्वगायिका (Singer) सुनिधी चौहानचा (Sunidhi Chauhan) जन्म (Birthday) 14 ऑगस्ट 1983 रोजी दिल्लीत झाला. सुनिधीने तिच्या दमदार गायनाच्या जोरावर स्वतःची गायकी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुनिधीने वयाच्या 4 व्या वर्षापासून माईक हाती घेतला होता. सुनिधीचे वडील थिएटर आर्टिस्ट असल्याने तिने लहानपणापासूनच स्टेज शो करायला सुरुवात केली. सुनिधीने नवरात्रोत्सवात गाण गायला सुरवात केली. (After 9 years, Sunidhi Chauhan got married to musician Hitesh Sonic again)

Sunidhi Chauhan

सुनिधी चौहान छोट्या मोठ्या ठिकाणी अनेकदा गायची, पण 'मेरी आवाज सुनो' स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तिला खरी ओळख मिळाली. सुनिधी या शो ची विनर झाली आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर तीने करिअरच्या क्षेत्रात मागे वळून पाहिलेच नाही.

Sunidhi Chauhan

सुनिधीचे वडील थिएटर आर्टिस्ट असल्याने तिने लहानपणापासूनच स्टेज शो करायला सुरुवात केली.

Sunidhi Chauhan

16 वर्षीय सुनिधीला राम गोपाल वर्माच्या 'मस्त' चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटाची सर्व गाणी सुपरहिट झाली आणि सुनिधीची कारकीर्दही हिट झाली.

Sunidhi Chauhan

जेव्हा सुनिधी चौहानने 'रुकी रुकी सी जिंदगी' गायले तेव्हा हे गाणे इतके जबरदस्त हिट झाले की तिला या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हिंदीबरोबरच तीने पंजाबी, बंगाली, आसामी, नेपाळी, तमिळ भाषांमध्येही गायले आहे.

Sunidhi Chauhan

चित्रपटांशिवाय सुनिधी चौहानने अनेक म्युझिक अल्बममसाठीही गायन केले आहे. तीचे देशातच नाही तर परदेशात स्टेज शो होतात. आतापर्यंत तिने 3 हजारांहून अधिक गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे

Sunidhi Chauhan

सुनिधी चौहान चा फॅशन आयकॉन आधुनिक आणि धाडसी आहे. जेव्हा सुंदर सुनिधी स्टेजवर जाते, तेव्हा तीची प्रेक्षकांवर हटके छाप पडते. यामध्ये तीच्या सुरेल आवाजासोबतच तीच्या लूक आणि स्टाईलचाही मोठा प्रभाव पडतो.

Sunidhi Chauhan

सुनिधी चौहानने खूप लहान वयात मोठे यश मिळवले आहे. जेव्हा तीची कारकीर्द शिखरावर पोहोचली, तेव्हा तीचा दर्जाही वाढला. पण लहान वयात सुनिधीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत घेतलेले निर्णय यशस्वी झाले नाहीत.

Sunidhi Chauhan

जेव्हा सुनिधी 18 वर्षांची होती, तेव्हा तिच्या कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता, तिने तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठ्या असलेल्या दिग्दर्शक बॉबी खानशी लग्न केले, पण तिचा निर्णय चुकला आणि एका वर्षातच त्यांचे लग्न मोडले.

Sunidhi Chauhan

घटस्फोटानंतर सुनिधी खूपच तुटली होती पण नंतर 9 वर्षांनी संगीतकार हितेश सोनिक बरोबर तीने पुन्हा लग्न केले. हितेश आणि सुनिधी यांच्यात 14 वर्षांचे अंतर आहे पण दोघेही वर्षानुवर्षापासून एकमेकांना ओळखत होते.Insta

Sunidhi Chauhan
Sunidhi Chauhan

सुनिधी आणि हितेशला तेघ सोनिक नावाचा मुलगा आहे. सुनिधी अनेकदा तिच्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT