Adipurush New Poster: Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush New Poster Out Now: रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रभासचे चाहत्यांना मोठं गिफ्ट; नवं पोस्टर लाँच

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर 'आदिपुरुष'चे नवे पोस्टर समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

On Ram Navmi 2023 Adipurush New Poster Out Now: आज भगवान श्री राम यांचा जन्मोत्सव म्हणजेच राम नवमी आहे. देशभरात राम जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. 

त्याचबरोबर या शुभ मुहुर्तावर प्रभासच्या आदिपुरुषच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये सर्व स्टार्स राम दरबारच्या पोजमध्ये दिसत आहेत. पोस्टर समोर येताच ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 

पोस्टरमध्ये (Poster) रामाच्या भूमिकेत प्रभास (Prabhas) , जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, शेषच्या भूमिकेत सनी सिंग आणि बजरंगबलीच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसत आहेत. 

राम, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासमोर हनुमानजी नमस्कार करताना दिसतात. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रभू श्री राम यांच्या गुणांचे चित्रण करणार आहे. 

तसेच त्यांचा धर्म, धैर्य आणि बलिदान दाखवतील. श्री राम भक्तांनी पुजलेला राम दरबार या पोस्टरमध्ये उत्तम प्रकारे दाखवण्यात आला आहे.

रामनवमी ही प्रभू श्री रामाची जयंती आणि चांगुलपणाची सुरुवात म्हणून साजरी केली जात असल्याने, निर्मात्यांनी देवत्वाचे महत्त्वपूर्ण प्रतीक सादर केले आहे.

जे अधर्मावर धर्माच्या विजयाची स्थापना दर्शवते. भारतीय (India) महाकाव्य रामायणावर आधारित आदिपुरुष 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे.

  • 16 जूनला होणार रिलीज

या बिग बजेट चित्रपटात (Movie) प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग यांच्यासह अनेक कलाकार भुमिका साकरणार आहे. आदिपुरुषचे दिग्दर्शन ओम राऊत, टी-सीरीज निर्मित भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर यांनी केले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT