Urvashi Rautela Dainik Gomantak
मनोरंजन

Urvashi Rautela Viral Tweet : उर्वशीने थेट पवन कल्याणला आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं...युजर्सचा कमेंट बॉक्समध्ये धुडगूस

Rahul sadolikar

उर्वशी रौतेला ही बॉलीवूडची एक अशी अभिनेत्री आहे जिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या कारनाम्यांची अधिक चर्चा असते. आता पुन्हा उर्वशीने सोशल मिडीयावर चर्चेला कारण दिले आहे. बॉलिवूडची सौंदर्यवती उर्वशी रौतेला ही नेहमीच चर्चेत राहते ती चित्रपटात कमी दिसत असली तरी सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. त्यामुळे चर्चेतही असते. असं कधी होणारच नाही की उर्वशी रौतेलानं काही पोस्ट शेयर केली अन् ती व्हायरल झाली नाही.

ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोल होत असते. बऱ्याचदा ती क्रिकेटर ऋषभ पंत याच्यामुळे ट्रोलिंगचा सामना करत असते. ती नेहमी अशा काही पोस्ट टाकत असते की नेटकरी तिच्यावर निशाणा साधतात.

उर्वशी रौतेलाचं ट्विट

लोकांनी विचारात पडावं असं काही तरी उर्वशीनं आता पुन्हा केलं आहे. तिनं एक ट्विट केलं मात्र नेहमी प्रमाणे त्या ट्विटमध्ये गडबड केली. उर्वशी तिच्या ट्विटमध्ये चुकून अभिनेता पवन कल्याणला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हटलं.

उर्वशी रौतेला पवन कल्याणसोबत 'ब्रो' चित्रपटात एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान अभिनेत्रीनं या चित्रपटानिमित्त सोशल मिडियावर ही पोस्ट टाकली होती.

उर्वशी पोस्टमध्ये लिहिते की

ती पोस्टमध्ये लिहिते की, आंध्र प्रदेशच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना आनंद झाला..पवनकल्याण आमच्या #BroTheAvatar चित्रपटात उद्या #२८ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होत'

काही वेळात तिचं हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झालं अन् नेटकऱ्यांनी तिला अक्कल शिकवायला सुरुवात केली. नेटकऱ्यांनी तिला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आहेत असं सांगत तिच्या ज्ञानात भर केली.

मद्यपान करू नको !

एका यूजरने लिहिले की ही तु खरचं 'नो ब्युटी नो ब्रेन' आहे. तर एकानं तिला मद्यपान न करता ट्विट करण्याचा सल्ला दिला.

इतकच नाही तर पवन कल्याणच्या पॅरोडी अकाऊंटनेही या ट्विटवर कमेंट केली आहे. 'ट्विटरवर मला आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री बनवल्याबद्दल धन्यवाद . मी खूप आनंदी आहे. लवकरच भेटू.' असा खोचक टोमणा त्यांनी उर्वशीला मारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT