Sonam kapoor baby shower Dainik Gomantak
मनोरंजन

सोनम कपूरचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला रद्द, समोर आलं हे कारण

अभिनेते अनिल कपूर यांनी आयोजित केला होता खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी म्हणजेच अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. सोनम कपूर सध्या तिच्या गरोदरपणामुळे अणि गरोदरपणातील फोटोशूट यामुळे सध्या खूप चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सोनमच्या मित्रमैत्रिणींनी लंडनमध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोनम कपूर नुकतीच लंडनहून मुंबईला परत आली आहे. ती परत आल्यानंतर तिचे वडील अभिनेते अनिल कपूर यांनी खास डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आता हा कार्यक्रम रद्द झाल्याचे समोर आलेले आहे. (Sonam kapoor baby shower cancel)

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रसह मुंबई तसेच इतर अनेक शहरात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. याच पार्शवभूमीवर सोनम कपूरचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कपूर कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कपूर कुटुंब सोनम कपूरच्या बेबी शॉवरची जोरात तयारी करत होते. या कार्यक्रमानिमित्त अनेक पाहुण्यांना आमंत्रण आणि त्यासोबत वेगवेगळ्या भेटवस्तूही पाठवण्यात आल्या होत्या.

उद्या म्हणजेच १७ जुलैला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम कविता सिंह यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. परंतु वाढत्या करोनाच्या केसेसमुळे कपूर कुटुंबाची चिंता वाढली आहे. सोनम आणि कपूर कुटुंबियांच्या आरोग्याप्रती दक्षता बाळगून त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर,सोनम कपूरलाही तिच्या होणाऱ्या बाळाबद्दल कोणताही निष्काळजीपणा नको आहे. त्यामुळे तिनेही हा कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असल्याचं समजत आहे.

या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी सोनम कपूरची मैत्रिणी मसाबा गुप्ता ही खास ड्रेस तयार करणार होती. तर अनिल कपूर आणि सुनिता कपूर हे दोघे ही पार्टी होस्ट करणार होते. या कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. यात दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, मलायका अरोरा, करीना कपूर, स्वरा भास्कर, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह अनेक कलाकारांना आणि जवळच्या नातेवाईकांना निमंत्रणही पाठवण्यात आलं होतं. पण हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT