Sana Saeed  Dainik Gomantak
मनोरंजन

Sana Saeed: कुछ कुछ होता है मधल्या शाहरुखच्या मुलीचा आटोपला साखरपुडा...

'कुछ कुछ होता है' चित्रपटात शाहरुखच्या मुलीचा रोल केलेल्या सना सईदचा साखरपुडा झाला आहे.

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट कोण विसरेल. या चित्रपटातली शाहरुख- काजोलची भन्नाट केमिस्ट्री सगळ्यांनी मनापासुन स्वीकारली होती. या चित्रपटात शाहरुखच्या मुलीचा रोल केलेली सना सईद आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.नुकताच तिचा साखरपुडा आटोपला आहे. तिने स्वत: इंन्स्टाग्रामवर ही माहिती दिली असुन सगळीकडुन तिला शुभेच्छा मिळत आहे.

सना सईदने तिचा बॉयफ्रेंड 'साबा वॅगनर' याच्याशी साखरपुडा केला असुन या सोहळ्याची झलक तिने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका व्हिडीओतुन आपल्या फॅन्सना दिली आहे.नव्या वर्षात दोघांनी आपल्या नात्याची सुरूवात केली आहे. या व्हिडीओत दोघेही ब्लॅक आऊटफिट मध्ये दिसतायत. साबाने सनाला गुडघ्यावर बसुन साखरपुड्याची अंगठी घातली यावेळी सना प्रचंड एक्साईट झाल्याचं या व्हिडीओत बघायला मिळतं.

सनाने आपल्या साखरपुड्याची माहिती देताच तिच्यावर फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सनाने 'कुछ कुछ होता है' मध्ये शाहरुखच्या मुलीचा रोल केला होता. त्यानंतर तिने 'हर दिल जो प्यार करेगा' या चित्रपटात ती दिसली होती. याशिवाय बालकलाकार म्हणुन अभिनेता बॉबी देओलच्या बादल चित्रपटातही काम केलं आहे. 2012 मध्ये सनाने वरुण धवन आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याबरोबर एक अभिनेत्री म्हणुनही करिअरला सुरूवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT