actress rupa dutta arrested in kolkata on the charges of pickpocketing Dainik Gomantak
मनोरंजन

'या' अभिनेत्रीला अटक, धक्कादायक कारण आलं समोर

अभिनेत्रीकडून एक डायरीही सापडली असून, त्यात आतापर्यंतच्या सर्व रकमेचा हिशेब नोंदवला आहे

दैनिक गोमन्तक

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रूपा दत्ता हिच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, रुपा दत्ताला खिशे मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यादरम्यान घडली.

विधाननगर उत्तर पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एका महिलेला डस्टबिनमध्ये बॅग फेकताना पाहून पोलिसांना तिच्यावर संशय आला, त्यानंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी महिलेची चौकशी सुरू केली. यासोबतच बॅगचीही झडती घेण्यात आली, त्यात पोलिसांना अनेक पैशांची वेगवेगळी पाकिटे सापडली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अभिनेत्रीकडून 75 हजार रुपयेही जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपा दत्ता तीच अभिनेत्री आहे जिने काही वर्षांपूर्वी अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

पोलिसांच्या चौकशीत अभिनेत्रीकडे एवढे पैसे कोठून आले हे कळू शकलेले नाही. यादरम्यान महिलेने खिसा मारल्याची कबुली दिली आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, ती वेगवेगळ्या जत्रेत, कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या पर्स चोरायची. आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यादरम्यान महिलेची ही युक्ती चालली नाही आणि पोलिसांनी तिला पकडले.

एक अभिनेत्री लोकांच्या पर्स कशा चोरू शकते याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. रूपा दत्ता ही एक लोकप्रिय अभिनेत्री (actress) आहे जी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती अनेकदा मोठ्या कार्यक्रमांचा भाग असायची. अभिनेत्रीकडून एक डायरीही सापडली असून, त्यात आतापर्यंतच्या सर्व रकमेचा हिशेब नोंदवला आहे. सध्या पोलिसांनी (police) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ती हे सर्व का करत होती हे लवकरच कळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT