Rekha In TV Serial Dainik Gomantak
मनोरंजन

Rekha In TV Serial : अभिनेत्री रेखाची लवकरच या टिव्ही सिरीयलमध्ये एन्ट्री

अभिनेत्री रेखा आता लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन अभिनेत्री रेखा प्रेक्षकांना कोणत्याही चित्रपटांच्या माध्यमातून भेटल्या नाहीत. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा यांना पाहणे सोपे नाही. आता त्या सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमांमध्ये क्वचितच दिसतात. त्यांचा पडद्यावरचा वावरही बराच कमी केला आहे. अशा परिस्थितीत चाहते त्यांना पाहण्यासाठी आसुसलेले असतात. 

पण आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहोत. रेखा लवकरच टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. ती आता स्टार प्लसची हिट सीरियल 'गम है किसी के प्यार में' मध्ये दिसणार आहे.

स्टार प्लसची प्रसिद्ध मालिका

स्टार प्लस मालिका 'गुम है किसी के प्यार में' हा केवळ जुन्या पिढीसाठीच नाही तर तरुण पिढीसाठी देखील एक उत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध कार्यक्रम आहे. जबरदस्त ट्विस्टमुळे हा शो नेहमीच टीआरपीच्या यादीत राहिला. आता अभिनेत्री रेखा या शोमध्ये खास भूमिका साकारणार आहे.

रेखा यापूर्वही स्टार प्लसवर दिसल्या होत्या

रेखा स्टार प्लसवर तिसर्‍यांदा दिसणार आहे. याआधीही ती 'गम है किसी के प्यार में'सोबत जोडली गेली आहे. जेव्हा प्रेक्षकांनी त्याला टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं तेव्हा त्या आनंदी झाल्या होत्या. रेखाचा या शोशी संबंध नेहमीच खास राहिला आहे.

वास्तविक 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत मोठे ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. रेखा शोच्या नव्या कलाकारांची ओळख करून देणार आहे. त्यामुळे ती या शोमध्ये स्पेशल अपिअरन्समध्ये दिसणार आहे.

शो किती वाजता पाहाल?

राजेश राम सिंग, पिया बाजपेयी, प्रदीप कुमार आणि शैका परवीन यांनी या शोची संयुक्त निर्मिती केली आहे. सोमवार ते रविवार रात्री ८ वाजता हा शो स्टारप्लसवर प्रसारित होईल. या लोकप्रिय मालिकेत रेखाची होणारी एन्ट्री मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आणणारी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT