Rashmika's Fraud Manager Dainik Gomantak
मनोरंजन

Rashmika's Fraud Manager : या अभिनेत्रीच्या मॅनेजरनेच केला 80 लाखांचा अपहार?

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या मॅनेजरनेच तिच्या आर्थिक व्यवहारात घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे.

Rahul sadolikar

मोठमोठ्या कलाकारांचे व्यवहार पाहण्यासाठी त्यांनी काही खासगी मॅनेजर नियुक्त केलेले असतात, हे मॅनेजर कलाकारांचे आर्थिक तसेच कायदेशीर व्यवहार पाहत असतात. करोडो रुपयांचे व्यवहार पाहणारा एक मॅनेजर एका अभिनेत्रीसाठी मात्र चांगलाच अडचणीचा ठरला आहे. 'पुष्पा' गर्ल रश्मिका मंदान्ना हिची नुकतीच 80 लाख रुपयांची फसवणूक झाली. हे कृत्य करणारी व्यक्ती अनोळखी नसून त्याचा व्यवस्थापक होता. यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. 

असे म्हटले जाते की, रश्मिका तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच मॅनेजरसोबत होती. जेव्हा या बातमीने मीडियात जोर पकडला तेव्हा दोघांनी अधिकृत निवेदन जारी केले. वेगळे होण्याचा निर्णय त्यांच्या स्वेच्छेने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कोणीही कोणाला काढलेले नाही.

रश्मिकाची 80 लाखांची फसवणूक

वास्तविक, 'पिंकविला'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रश्मिका मंदान्नाची 80 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आता अधिकृत निवेदनात रश्मिका मंदान्ना आणि मॅनेजर दोघांनीही त्यांच्यामध्ये कोणतेही वैर नसल्याचे सांगितले आहे.

 दोघांनीही वेगळे होण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या विभक्त होण्याचा निर्णय कोणाचा नाही. त्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे...

जारी केलेल्या निवेदनात लिहिले आहे की, 'आमच्यामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही. आम्ही सलोख्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही का वेगळे होत आहोत या अफवांमध्ये तथ्य नाही. आम्ही पूर्णपणे व्यवसायात आहोत आणि आम्ही आतापासून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रश्मिका आणि तिच्या मॅनेजरने गुरुवारी 22 जून रोजी याची घोषणा केली आहे.

मॅनेजरला काढले नाही

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये रश्मिकाची तिच्या मॅनेजरने 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा केला होता. याबाबत काही चर्चाही सुरू आहेत. यावरून तिला कोणताही वाद निर्माण करायचा नाही हे उघड आहे. त्यामुळे ते मौन बाळगून आहेत. मात्र आता निवेदन जारी करून दोघांनीही फसवणुकीमुळे व्यवस्थापकाला काढले नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट दोघांनी मिळून घेतलेला निर्णय आहे.

पुष्पा 2 ची चर्चा

अभिनेत्री रश्मिकाच्या पुष्पा चित्रपटातल्या पात्राची आणि तिच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली होती. तिने पुष्पा चित्रपटात श्रीवल्ली हे पात्र साकारलं आहे. श्रीवल्ली हे पात्र आणि याच नावाचं गाणं यांची जोरदार चर्चा कोविडच्या काळात झाली होती. पुष्पा 2 मध्येही श्रीवल्लीची उत्सुकता प्रेक्षकांना असणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT