Arjun Kapoor - Malaika Dainik Gomantak
मनोरंजन

Arjun Kapoor - Malaika : इकडे अर्जुनसोबतच्या ब्रेक-अपच्या अफवा आणि तिकडे मलायकाने त्याच्या बहिणींना अनफॉलो केलं...

अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेक-अपच्या चर्चांना सध्या बॉलीवूडमध्ये चांगलेच उधाण आले आहे.

Rahul sadolikar

Arjun Kapoor - Malaika Break -up news : मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या फॅशन आणि डान्स मूव्ह्सने चाहत्यांना नव्याने आपल्या प्रेमात पाडत असते. 

वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं तर मलायकाने अरबाज खानसोबत लग्न केले होते. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले आणि 2002 मध्ये अरहान खानला जन्म दिला. 

मलायका - अरबाजचा तो निर्णय

सुमारे दोन दशकांनंतर, मलायका- अरबाज जोडप्याने त्यांचे विभक्त होण्याची घोषणा केली आणि 2017 मध्ये घटस्फोट घेतला. आयुष्यात वेगाने वाटचाल करत असलेली मलायका हँडसम हंकअर्जुन कपूरला डेट करत आहे. 

जरी मलायका अर्जुच्या प्रेमकथेच्या बातम्यां सोशल मिडीयावर सुरु असल्या तरीही आता दोघांच्या ब्रेक- अपच्या बातम्या समोर येत आहेत.

मलाईकाने अर्जुनच्या कुटूंबियांना केले अनफॉलो

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या अफवा सुरू असताना आता मलायका अरोराने अर्जुनच्या कुटुंबातील सदस्यांना अनफॉलो केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून, मलायका अरोरा तिच्या इन्स्टा स्टोरीवर इन्स्पिरेशनल पोस्ट शेअर करत आहे आणि नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या तिच्या पोस्टवरुनच तिच्यात आणि अर्जुनमध्ये सर्व आलबेल नाही असाच अंदाज लावत आहेत. 

या सगळ्या दरम्यान, मलायकाने अर्जुनच्या कुटुंबातील सदस्यांना अनफॉलो केल्यामुळे आगीत आणखीनच भर पडली.

Malaika Arora

रेडिट थ्रेडवर यूजर म्हणतात

रेडिट थ्रेडवर मलायकाच्या पोस्ट शेअर करण्यात आला होती. मलायकाने अर्जुनच्या बहिणी जान्हवी कपूर, अंशुला कपूर आणि खुशी कपूर यांना कसे अनफॉलो केले आहे हेही युजरने दाखवले. 

Reddit युजरने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'मलाइकाने जान्हवी, खुशी, अंशुला आणि बोनी यांना अनफॉलो केले आहे. ती अजूनही अर्जुनला फॉलो करते. कौटुंबिक मतभेदामुळे हे घडल्याचे दिसते.

युजरने दिला पुरावा...

Reddit वर स्क्रीनशॉट शेअर होताच, नेटिझन्सनी कमेंट्स सेक्शनमध्ये त्यांचे मत व्यक्त करण्यास सुरुवात केली. फोटोवर प्रतिक्रिया देताना, काही युजर्सनी सांगितले की मलायका कधीही जान्हवी कपूरला फॉलो करत नाही, तर काहींनी सांगितले की अर्जुनची बहीण अंशुला मलायकाच्या यादीत होती, तिला आता मात्र मलायकाने अलीकडेच अनफॉलो केले

त्या पोस्टमुळे अफवा

17 ऑगस्ट 2023 रोजी, अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा हँडलवर एक पोस्ट टाकली, ज्यामुळे मलायकासोबतच्या त्याच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या.

 पोस्टमध्ये, अर्जुन संपूर्णपणे एकटाच सहलीचा आनंद घेताना दिसला ;पण, हे नेटिझन्सना आश्चर्यचकित केले कारण अर्जुनच्या सहलींना मलायका सोबत असते. तेव्हापासून अफवांना जोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT