Actors Suicide  Dainik Gomantak
मनोरंजन

Actors Suicide : आयुष्यात आलेल्या संकटांना कंटाळून या कलाकारांनी तारुण्यातच मृत्यूला कवटाळले

Actors Suicide : असे अनेक टीव्ही स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. या यादीत सुशांत सिंग राजपूत, वैशाली ठक्कर यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक
Vaishali Takkar

वैशाली ठक्कर : 'ये रिश्ता क्या कहलाता है' स्टार वैशाली ठक्करने नुकतीच आपली जीवनयात्रा संपवली. वैशाली ठक्कर हिने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती. वैशाली ठक्कर हिने नाते तुटल्याच्या दु:खाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते.

Sushant Singh Rajput

सुशांत सिंग राजपूत : टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी गळफास लावून घेतला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बराच गदारोळ झाला होता. सुशांत सिंग राजपूतची हत्या झाल्याचा दावा लोकांनी केला. या प्रकरणामुळे सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलाही तुरुंगाची हवा खावी लागली होती. सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी हे जग सोडले.

Kushaal Punjabi

कुशल पंजाबी : कुशल पंजाबी यानेही कौटुंबिक वादातून आपला जीव दिला. 27 डिसेंबर 2019 रोजी कुशल पंजाबीचा मृतदेह त्याच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या बातमीने संपूर्ण टीव्ही जगाला हादरवून सोडले. कुशलने आत्महत्या केली तेव्हा तो केवळ 42 वर्षांचा होता.

Pratyusha Banerjee

प्रत्युषा बॅनर्जी : टीव्हीची एक चांगली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने एप्रिल 2016 मध्ये आत्महत्या केली होती. प्रत्युषा बॅनर्जीने वयाच्या 24 व्या वर्षी गळफास लावून घेतला. प्रत्युषा बॅनर्जीने प्रियकराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते.

Samir Sharma

समीर शर्मा : 'कहानी घर घर की', 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'ये रिश्ते हैं प्यार के' सारख्या शोमध्ये काम करणारा समीर शर्मा त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. समीर शर्मा यांनी आत्महत्या केली. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी आपले जीवन संपवले. मात्र, समीर शर्माने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT