Salman's Casting Director Dainik Gomantak
मनोरंजन

Salman's Casting Director : सलमानच्या कास्टिंग डिरेक्टरला बेदम मारहाण, रुग्णालयात केलं दाखल...

अभिनेता सलमान खानच्या कास्टिंग डिरेक्टरला दिल्लीत बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

Rahul sadolikar

Salman Khan Casting Director: अभिनेता सलमान सोशल मिडीयावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी सलमान खानशी संबंधित एक बातमी चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. सलमान खानच्या एका चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक आणि कास्टिंग डायरेक्टर असलेल्या मयंक दीक्षितला मारहाण करण्यात आली.

ही घटना दिल्लीतील असून या मारामारीत तो जबर जखमी झाला. ही घटना रविवारची असून याप्रकरणी काही अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

टोळक्याने केली मारहाण

मयंक दीक्षित यांना रविवारी रात्री (2 जुलैच्या रात्री) लक्ष्मी नगर परिसरात काही लोकांच्या टोळक्याने मारहाण केल्याने त्यांच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. दरम्यान या अनोळखी व्यक्तींविरोधात FIR दाखल करण्यात आलाय

आरोपींसोबत झाला वाद

रविवारी दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात 6 जणांच्या टोळक्याने सलमान खानच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला बेदम मारहाण केली. यात कोणताही वैयक्तिक वाद नसुन रस्त्यावरील रागाचे आहे.

घटना अशी आहे की, कार रिव्हर्स करताना कास्टिंग डायरेक्टरचा मयंकचा आरोपींसोबत वाद झाला आणि ते पाहताच त्यांच्यात हाणामारी झाली. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे, मात्र अद्याप या लोकांची ओळख पटलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT