Pankaj Tripathi Passes Away  Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेता पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन...बातमी समजताच उत्तराखंड इथलं शूटींग थांबवलं

अभिनेता पंकज त्रिपाठीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचं निधन झालं आहे.

Rahul sadolikar

Actor Pankaj Tripathi Passes away : अभिनेता पंकज त्रिपाठीचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. हे वृत्त समजताच पंकज त्रिपाठी यांनी उत्तराखंड येथे सुरू असलेलं शूटींग थांबवलं.,

बिहारमधील बेलसंड येथील त्यांच्या बनारस तिवारी यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज त्रिपाठींचे वडील आईसोबत मूळ गावी राहत होते तर पंकज पत्नी आणि मुलीसह मुंबईत राहतात.

कुटूंबाकडून निवेदन प्रसिद्ध

कुटुंबाकडून अधिकृत निवेदनात असे लिहिले आहे की, “पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस त्रिपाठी राहिले नाहीत हे वृत्त आम्ही जड अंतःकरणाने देत आहोत . ते 98 वर्षे निरोगी आयुष्य जगले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज त्रिपाठी सध्या गोपालगंजमधील त्यांच्या गावी जात आहेत.

पंकज त्रिपाठींची जुनी मुलाखत

याआधी HT ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठींनी त्यांच्या वडिलांबद्दल आणि त्यांनी डॉक्टर होण्याच्या इच्छेबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते “माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे. 

उत्तर बिहारमधील गोपालगंजमधील एका गावात मी ज्या ठिकाणचा आहे - लोकांना फक्त दोनच व्यवसाय माहित आहेत: इंजिनियर किंवा डॉक्टर. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे गाव दुर्गम भागात इतके वसलेले आहे तिथे अजूनही चांगले बांधलेले रस्ते नाहीत,”

पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले

पंकज त्रिपाठी पुढे म्हणाले की त्याच्या कुटुंबाने त्याच्या अभिनयाच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. “त्यांची कोणतीही स्वप्ने मी पूर्ण करावीत अशी त्यांचा इच्छा नव्हती, त्यांना एकच चिंता होती की मी व्यवस्थित नोकरी मिळवून आपले आयुष्य चांगले जगायला हवं. 

मी त्यांना सांगितले की जर मी दिल्लीला गेलो (पंकज नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी आहे) तर मला सरकारी नोकरीही मिळू शकेल. आता मध्यमवर्गीय लोकांची गोष्ट अशी आहे की सरकारी नोकरी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. माझ्या वडिलांनी मग मला जाऊ दिलं होतं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT