Kazan Khan Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Kazan Khan Passes Away: साऊथचा हा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड..

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कजान खान यांचे निधन झाले आहे.

Rahul sadolikar

Kazan Khan Passes Away: साऊथ इंडस्ट्रीतून गेल्या काही दिवसांपासुन वाईट बातम्या समोर येत आहेत. . नुकतेच 'असुरन' चित्रपटाचा सहाय्यक अभिनेता रस्ता अपघातात ठार झाला आणि आता मल्याळम अभिनेता कजान खानने या जगाचा निरोप घेतला आहे.

प्रसिद्ध अभिनेते कजान खान यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

प्रॉडक्शन कंट्रोलर आणि प्रोड्यूसर एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कजान खान यांच्या निधनाची माहिती दिली. एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कजान खानचा एक फोटो शेअर केला आहे. कजान खानने 1992 मध्ये सेंथामिझ पटू या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

यानंतर त्याने 'सेतुपती आयपीएस', 'कलाईगनन', 'मुराई मामन' आणि 'करुप्पा नीला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. कजान खानने तमिळ आणि मल्याळम भाषेतील ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. तो खलनायक आणि नकारात्मक पात्रांसाठी ओळखला जात असे..

कजान खान जेव्हा चित्रपटाच्या पडद्यावर दिसायचा तेव्हा खलनायकाच्या भूमिकेतील त्याचा भयानक अवतार आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रेक्षक घाबरायचे.

कजान खानने खलनायकाच्या पात्रांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते आणि तो सर्वांचा आवडता बनला होता. क्वचितच खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

SCROLL FOR NEXT