Dharmendra Viral Post Dainik Gomantak
मनोरंजन

Dharmendra Viral Post : आपण बोलू शकलो असतो ;पण...धर्मेंद्र यांची ही भावनिक पोस्ट होतेय व्हायरल

अभिनेते धर्मेंद्र यांची एक भावनिक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे

Rahul sadolikar

Dharmendra Apologises News: अभिनेते धर्मेंद्र सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. अलीकडेच सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नात धर्मेंद्र नाचताना दिसले. पण आता मात्र धर्मेंद्र यांचा सध्या इमोशनल अंदाज पाहायला मिळतोय.

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी हेमा मालिनी आणि मुली इशा आणि आहाना यांची माफी मागितलीय. काय म्हणाले आहेत धर्मेंद्र बघूया..

मी वैयक्तिक बोलू शकतो ;पण

धर्मेंद्र लिहितात... 'ईशा, आहाना, हेमा आणि माझी सर्व प्रिय मुले... तख्तानी आणि वोहरा कुटुंबे मला आवडतात आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आदर करतो... वय आणि आजारपण माझ्यासोबत वाढत आहे. मी तुमच्याशी वैयक्तिक बोलू शकेन, पण...'

अशी पोस्ट लिहून धर्मेंद्र यांनी दोन हात जोडणारे ईमोजी जोडले आहेत. अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांना त्यांच्या कुटुंबियांना काय सांगायचे होते, पण सांगता आले नाही, असा विचार करायला हवा. धर्मेंद्रची इन्स्टाग्राम पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली.

यापूर्वीही अशा पोस्ट

यापूर्वीही धर्मेंद्रने अशा काही दु:खद पोस्ट शेअर केल्या होत्या की चाहत्यांची मनं भरून आली होती.

आता धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा आणि मुली ईशा, आहाना यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. धर्मेंद्र यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना काहीसा नवा आहे.

धर्मेंद्र यांचे चाहते नाराज

ही पोस्ट पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये आरोग्य आणि आजाराविषयी सांगितले आहे.धर्मेद्र यांना काहीतरी बोलायचे आहे पण नेमके काय ते कळू शकत नाही. धर्मेंद्र आपले मन पूर्णपणे व्यक्त करू शकले नाहीत.

या अर्धवट बोलण्यामुळे लोक अंदाज बांधू लागले आहेत. चाहते धर्मेंद्रच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत आणि पोस्टवर कमेंट करून त्यांना काय झाले आहे असे सतत विचारत आहेत.

जगण्या - मरण्याचं कशाला बोलता?

याआधीही धर्मेंद्रने अशाच दोन पोस्ट टाकल्या होत्या, ज्यानंतर चाहते नाराज झाले होते. जगण्या-मरण्याचं बोलण्याचं कारण काय, असे प्रश्न चाहते सतत विचारत आहेत. 1960 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरवात केलेल्या धर्मेंद्र यांनी तब्बल तीन दशकं बॉलीवूडवर राज्य केलं.

धर्मेंद्र वयाच्या 87 व्या वर्षी देखील फिट आहेत आणि सक्रिय देखील आहेत. पण सध्या धर्मेंद्रचा हा भावनिक अंदाज फॅन्सना नवीन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT