Malaika Arora | Arjun Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika Arora Pregrancy: मलायका अरोराच्या प्रेग्नन्सीवरून भडकला अर्जून कपूर

सोशल मीडियात शेअर केली पोस्ट

Akshay Nirmale

Arjun Kapoor Reaction On Malaika Arora Pregnancy: बॉलीवुड अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहत आहेत. त्यातच आता मलायका गर्भवती असल्याच्या चर्चांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. या चर्चांवर आता अर्जून कपूरनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एका न्यूज पोर्टलने मलायकाच्या गर्भवती असण्याची बातमी दिली होती. त्यात मलायका अर्जूनच्या पहिल्या मुलाची आई बनणार आहे, असे म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये जेव्हा अर्जून आणि मलायका लंडन गेले होते तेव्हाच मलायकाने जवळच्या व्यक्तींना प्रेग्नन्सीबाबत कळवले होते. या बातमीनंतर अर्जून आणि मलायका पुन्हा चर्चेत आले.

तथापि, अर्जूनने सोशल मीडियात पोस्ट करून सगळ्यांवर राग काढला आहे. अर्जूनने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. हा अत्यंत खालच्या स्तराचा प्रकार आहे. आम्ही याकडे दुर्लक्ष करतो, पण प्रसारमाध्यमांमुळे या गोष्टी पसरतात आणि खऱ्या वाटू लागतात. पण हे अत्यंत असंवेदनशीलपणाचे लक्षण आहे. आमच्या खासगी आयुष्याची चेष्टा करण्याचा प्रयत्न करू नका, असेही अर्जूनने म्हटले आहे.

अर्जून आणि मलायका अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही सतत चर्चेतही असतात. बी टाऊनमधील सर्वाधिक चर्चा होणाऱ्या कपलपैकी हे एक कपल आहे. मलायकाचे यापुर्वी अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाझ खानसोबत लग्न झाले होते. दोघांना अरहान नावाचा एक मुलगाही आहे. 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून मलायका अर्जूनसोबत आहे. तर अरबाझही त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT