Accidental of Kacha Badam Fem singer Nature worrying Dainik Gomantak
मनोरंजन

'कच्चा बादाम' फेम गायकाचा अपघात; प्रकृती चिंताजनक

भुबन वाड्याकर कार चालवायला शिकत असताना त्याचा अपघात झाला दरम्यान अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

बीरभूम: पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये कच्चा बदाम फेम गायक भुबन बद्यकर यांचा अपघात झाला असून त्यात ते जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुवनच्या छातीला दुखापत झाली आहे. कार चालवायला शिकत असताना सोमवारी भुबन बडयकर यांचा अपघात झाला. भुबनने नुकतीच कार खरेदी केली आहे. भुबन कार चालवायला शिकत असताना हा अपघात झाला. (Accidental of Kacha Badam Fem singer Nature worrying)

अपघातानंतर (Accident) कच्चा बदाम फेम गायकाला सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. भुबन वाड्याकर हे पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकायचे आणि शेंगदाणे विकताना कच्चे बदाम गाायचे. हे गाणे सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, त्यानंतर भुबन वाड्याकर प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे भुबन वाड्याकरने अलीकडेच एका म्युझिक कंपनीसाठी 'कच्चा बदाम' या गाण्याचा (Song) व्हिडिओ शूट केला होता. त्याला अनेक कंपन्यांच्या आणि टीव्ही शोच्या ऑफर्स येत आहेत. त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. भुबन वाड्याकर यांची ख्याती म्हणजे आता ते कुठेही गेले की लोकांना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा असतो. भुवनच्या 'कच्चा बदाम' या गाण्यावर लाखो यूजर्सनी रील्स केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT