Sahadeva Dirdo

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा अपघात

'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा (Sahadeva Dirdo) मंगळवारी सायंकाळी अपघात झाला. यात तो जखमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदोचा (Sahadeva Dirdo) मंगळवारी सायंकाळी अपघात झाला. यात तो जखमी झाला आहे. हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हाधिकारी विनीत नंदनवार आणि एसपी सुनील शर्मा (Sunil Sharma) यांनी रुग्णालयात पोहोचून सहदेवच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे (Doctor) विचारपूस केली. प्राथमिक उपचारानंतर सहदेवला मेडिकल कॉलेज जगदलपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सहदेव मित्रांसह दुचाकीवरुन शबरीनगरच्या दिशेने जात होता. यादरम्यान रस्त्यावरील वाळू आणि गिट्टीमुळे बाईक अनियंत्रितपणे पलटी झाली. हेल्मेट न घातल्याने सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सहदेवला सुकमामधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी ऑपरेशन दरम्यान डोक्याला पाच टाके टाकले. यानंतर त्याला अधिकच्या उपचारासाठी जगदलपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.

बच्पन का प्यार या गाण्यासाठी इंटरनेट मीडियावर हिट झाला

घटनेची माहिती मिळताच प्रभारी मंत्री कावसी लखमा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून सहदेवची माहिती घेतली. तसेच उपचारासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पुरविण्याचे आदेश दिले. काही महिन्यांपूर्वी बच्पन का प्यार या गाण्यासाठी सहदेव दीरदो सोशल मीडियावर (Social media) हिट झाला होता. बॉलीवूड गायक बादशाहसोबत एक अल्बम देखील त्याने बनवला होता. ज्याला सोशल मीडियावर खूप हिट झाला होता.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला

सहदेव दिरदोच्या अपघाताच्या वृत्तावर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सुकमाचे जिल्हाधिकारी विनीत नंदनवार यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

एसपी हॉस्पिटलमध्ये पोहोचले

एसपी सुनील शर्मा आणि एएसपी ओम चंदेल यांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांकडून सहदेवच्या प्रकृतीची माहिती घेतली. उत्तम उपचारांबाबत बोलण्याबरोबरच त्यांनी जगदलपूरला रेफर करुन डॉक्टरांशी संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT