Abhishek Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Abhishek Bachchan: आई-वडीलांप्रमाणेच राजकारणात नशीब अजमावणार का? अभिषेक म्हणाला...

Abhishek Bachchan: 2023 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते.

दैनिक गोमन्तक

Abhishek Bachchan: बॉलीवूडमधील सितारे नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतात. कधी चित्रपटामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळेदेखील ते चर्चेत असतात. आता बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चन बद्दल मोठी चर्चा होऊ लागली आहे.

या चर्चांचे कारण अभिषेक बच्चनचा कोणताही आगामी चित्रपट नसून त्याचे पुढील काळातील करिअर हे आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आपल्या परिवारासारखेच अभिनय क्षेत्रानंतर राजकारणात आपले नशीब अजमावणार असे म्हटले जात होते. आपली आई जया बच्चनप्रमाणेच तो देखील समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करणार असे म्हटले जात होते.

मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखिलेश यादवच्या समाजवादी पार्टीत अभिषेक बच्चन प्रवेश करणार असून इलाहाबादमधून 2023 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता अभिषेक बच्चनने समोर येत या चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे.

2013 मध्ये एका मुलाखती दरम्यान, अभिषेक बच्चनला तू पण वडीलांसारखेच निवडणूक लढवणार का? त्यावेळी अभिषेकने पडद्यावर नेत्याची भूमिका करायला आवडेल मात्र खऱ्या आयुष्यात राजकारणात जायला आवडणार नसल्याचे म्हटले होते.

दरम्यान, बॉलीवूडचे बीग बी आणि अभिषेक बच्चनचे वडील आमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये बॉलीवूडमधून ब्रेक घेऊन राजीव गांधींच्या सांगण्यावरुन इलाहाबाद लोकसभा निवडणूक लढली होती. ही निवडणूक त्यांनी जिंकलीदेखील होती.

मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला होता. याबरोबरच, जया बच्चन या समाजवादी पार्टीतून राज्यसभेत सदस्य आहे.

गेल्या वर्षी अभिषेकचा दसवी या चित्रपटात नेत्याची भूमिका निभावली होती.आता अभिषेक बच्चन आगामी कोणत्या चित्रपटात दिसणार आणि कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT