Abdu Rozik Dainik Gomantak
मनोरंजन

Abdu Rozik: हा तर चमत्कारच ! बिग बॉस फेम अब्दूची उंची वाढतेय? फोटो शेअर करत त्याने स्वत: दिली माहिती

Abdu Rozik: याचा इलाज करण्यासाठी त्याच्याकडे , त्याच्या परिवाराकडे पैसे नव्हते.

दैनिक गोमन्तक

Abdu Rozik: बिग बॉस 16 मुळे प्रसिद्धीझोतात आलेला अब्दू रोझिक नेहमीच चर्चेत असतो. छोटा भाईजान म्हणून ओळख मिळवलेल्या अब्दूने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

18 वर्षाच्या अब्दू रोझिकची उंची कमी असली तरीही जगातल्या प्रसिद्ध व्यक्तीमत्तांपैकी एक आहे. आता अब्दूने त्याच्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

सोशल मिडियावर गाडी चालवत असल्याचा एक फोटो शेअर करत माझी उंची आता वाढत आहे असे अब्दूने म्हटले आहे. अब्दू ग्रोथ हार्मोन डिफेंसिएन्सी या आजाराचा सामना करत असल्याने त्याची उंची 3 फूट 1 इंच इतकी राहिली होती. त्याच्या शरीराच रिकेट्स निर्माण झाले होते. मात्र याचा इलाज करण्यासाठी त्याच्याकडे , त्याच्या परिवाराकडे पैसे नव्हते.

डॉक्टरांनी शून्य टक्के हार्मोन ग्रोथ असल्याचे सांगितले होते. मात्र मी आता अलहमदुलिल्लाहच्या चमत्कारामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे माझी उंची वाढत आहे असे अब्दूने आपल्या फोटोला शेअर करताना म्हटले आहे.

दरम्यान, ताजिकिस्तानचा सिंगर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अब्दूने बिग बॉस १६मध्ये आपल्या क्युटनेसने सगळ्यांचे मन जिंकले होते. भारतात त्याने आपल्या गोड स्वभावामुळे स्वताचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे.

बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये मंडलीचा एक भाग म्हणूनदेखील अब्दू चर्चेत होता. शिव ठाकरे , एमसी स्टॅन , निम्रित , सुंबुल , साजिद खान आणि अब्दूची ही मंडली मैत्रीसाठी विशेष ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दू आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे म्हटले जात होते. मात्र शिव ठाकरेने याला विरोध करताना मी आहे तोपर्यत मंडली तुटणार नाही असे म्हटले होते.

अब्दू रोझिकने आता इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे आणि दिलेल्या आनंदाच्या बातमीमुळे चाहतेदेखील आनंदी असल्याचे दिसून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT