Amir Khan and Genelia D'Souza Dainik Gomantak
मनोरंजन

Amir Khan 'जाने तू या जाने ना' च्या सिक्वेलमध्ये Genelia D'Souza सोबत झळकणार

आमिर खान आणि जेनेलिया डिसूजा 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये एकत्र दिसणार आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Amir Khan) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुजा 'जाने तू या जाने ना' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये एकत्र दिसणार आहे. जेनेलिया बरेच वर्षानंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुन्हा हा चित्रपट येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे तब्बल 15 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काय असेल, कथा कशी असेल, जेनेलियाचा लुक काय असेल याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे.

अभिनेत्री जेनेलियाने लग्नाआधी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहेत. लग्नानंतर तिने संसाराला जास्त प्राधान्य दिल्याने ती चित्रपट सृष्टीमधील बाहेर निघाली. पण तिचा 'जाने तू या जाने ना' 2008 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजसुद्धा डोळ्यांपुढे आहे. या चित्रपटामध्ये (Movie) आमिरचा भाचा इम्रान खान आणि जेनेलिया (Genelia D'Souza) मुख्य भूमीकेत होते. 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातील जेनेलियाचे काम पाहून अमीर खान अत्यंत प्रभावित झाला होता. म्हणूनच सिक्वेलमध्ये दोघांनी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. या संदर्भात काही आठवड्यांपूर्वीच एक खास बैठक पार पडली असून चित्रपटाला दोघांचाही होकार असल्याने बोलले जात आहे. या सिक्वेलची निर्मिती आमिर खान (Amir Khan) करणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

जेनेलियाने ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर 'मिनिस्टर मम्मी' कडून रोम-कॉमची घोषणा देखील केली होती. या चित्रपटात रितेश देशमुखसोबत दिसणार आहे. याशिवाय जेनेलियाने या महिन्याच्या सुरुवातीला एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत साऊथ चित्रपटांमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT