Aamir Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Love Story: आमिर खानची प्रेमकहाणी; मुलीने नकार दिला म्हणून केले होते मुंडण

मुलीने त्याला नकार दिल्यानंतर आमिर खानने मुंडण केल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.

दैनिक गोमन्तक

सध्या आमिर खान (Aamir Khan) त्याचा आगामी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटच्या (Laal Singh Chaddha) रिलीजच्या तयारीत व्यस्त आहे. नुकताच त्याने या चित्रपटाचा ट्रेलर देखील लाँच केला आहे. इंडस्ट्रीपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वांना माहिती आहे की, आमिर त्याचे प्रत्येक काम मना पासून करतो. त्याने एकदा एका मुलाखतीत दावा केला होता की तो प्रेमी होता. त्याने हा किस्साही सांगितला आणि मुलीने त्याला नकार दिल्यानंतर त्याने मुंडण केल्याचा धक्कादायक खुलासा देखील आमिरने त्यावेळी केला होता. (Aamir Khan love story The shaving was done as the girl refused)

आमीर खान म्हणाला की, लोकांचा असा विश्वास होता की चित्रपटामुळे त्याने त्याचे मुंडण केले असेल, परंतु सत्य हे होते की मुलीने नकार दिल्या नंतर त्याची 'बालिश आणि अपरिपक्व' प्रतिक्रिया त्याने दिली होती. आमिरने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1984 मध्ये आलेल्या 'होली' सिनेमापासून केली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिरच्या हेअरस्टाइलची मात्र जोरात चर्चेत होती.

या चित्रपटासाठी त्याने मुंडण केल्याचे अनेकांचे त्यावेळी मत होते. मात्र, आमिरने सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, दिग्दर्शक केतन मेहता यांना आश्चर्यचकित करण्यासाठी आमिरने आपले डोके मुंडन केले होते. पुढे तो म्हणाला की, "बर्‍याच जणांना वाटतं की मी चित्रपटासाठी मुंडन केलं, पण प्रत्यक्षात मी माझं मुंडन दुसऱ्याच कारणासाठी केलं होतं."

आमिर खानने केला बालिश अभिनय

आमिर खान पुढे म्हणाला, "मी एक मुलगी गमावली होती जिच्यावर मी खुप प्रेम करतो. म्हणजे एके दिवशी तिने मला सांगितले की ती माझ्यावर प्रेम करत नाही आणि म्हणून त्या वर प्रतिक्रिया देण्यासाठी, मी गेलो आणि माझे मुंडण केले. हे एक अतिशय बालिश आणि अपरिपक्व कृत्य होते, पण मी ते त्यावेळी केले. तेव्हा केतनने मला भेटायला बोलावले आणि मी त्याला भेटायला गेलो तेव्हा तो माझ्याकडे बघून म्हणाला होता की, 'तुझे केस कुठे गेले'.

आमिर खान एक प्रेमी,

जेव्हा सिमी गरेवालने नमूद केले की आमिर खान 'प्रेमी' आहे, तेव्हा त्याने उत्तर दिले की, "हो, मला असेच वाटते. तुम्ही असेही म्हणू शकता." जेव्हा मुलीने त्याला नाकारले, असे विचारले असता आमिर म्हणाला की, "हो, मला असे म्हणायचे की, जर तुम्ही बर्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुम्हाला माहित आहे की तिला नाही वाटते की ती माझ्यावर प्रेम करते किंवा मला महत्व देते आणि हे असे काहीतरी होते. मला त्याच्याबद्दल पूर्ण आदर आहे आणि आजपर्यंत मला त्याच्या निर्णयाचा आदर आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; विधानसभा विजयाबद्दल केले अभिनंदन

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

IFFI Goa 2024: "हा माहितीपट केवळ श्रद्धांजली नाही, मोहन रानडेंचे स्मारक व्हावे म्हणून केलेला प्रयत्न आहे"; चित्रपट महोत्सवात उभा राहिला मुक्तिसंग्राम

77th Army Day संचलनाची IFFI मध्ये झलक! पुणे सांभाळणार यजमानपदाची धुरा

Goa Crime: महिलांसाठी गोवा नॉट सेफ? 11 महिन्‍यांत सात महिलांची हत्या; लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या 100 घटना

SCROLL FOR NEXT