Ira Khan Engagement| Aamir Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Ira Khan Engagement: आमिर खान मुलीच्या साखरपुड्यात थिरकला आपल्याच गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

Aamir Khan Dance: इरा खानच्या साखरपुड्यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतो आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Amir Khan) मुलीचा आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेण्ड नुपूर शिखरे यांचा नुकताच साखरपुडा मोठ्या आनंदात पार पडला. 18 नोव्हेंबर 2022 रोजी शुक्रवारी संध्याकाळी आयराचा साखरपुडा नातेवाइक आणि मित्रपरिवामध्ये साजरा करम्यात आला. सोशल मिडियावर (Social Media) साखरपुड्याचे फोटो समोर येताच अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. आता या कार्यक्रमामधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Video) खुद्द आमिरचाच आहे. आपल्या मुलीच्या साखरपुड्यात तो आनंदाने नाचताना दिसतो आहे.

आयरा (Ira Khan) आणि नुपूर गेली कित्येक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे फोटोही अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चेत होते. पण काही महिन्यांपूर्वीच नुपूरने आयराला प्रपोज केले होते. आता अखेर त्यांचा साखरपुडा झाला आहे. साखरपुड्याला आयराने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.

तर नुपूरने काळा टक्सीडो सूट घातला होता. या समारंभातील एक व्हिडीओमध्ये (Video) चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये आमिर आनंदाने डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो 'पापा कहते हैं बडा नाम करेगा' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. समारंभासाठी आलेले पाहुणे खाली उभे राहून त्याच्याकडे पाहत आहेत तर तो वर उभा राहून नाचताना दिसतोय.

आमिरसह (Amir Khan) आणखी एक व्यक्ती आहे जे गाण्यावर थिरकताना दिसत आहे. खाली उभी असलेली आयरादेखील आपल्या वडिलांना नाचण्यासाठी चिअर्स करताना दिसते आहे. या व्हिडिओसोबतच आमिरच्या आउटफिटची देखील चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होत होती. त्याने शिमरी पठाणी कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. सोबत पांढऱ्या दाढीची स्टाइल केली होती. या लूकमध्ये तो अधिक स्मार्ट दिसत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT