Aamir Khan Kiara Advani  Dainik Gomantak
मनोरंजन

Aamir Khan's New Ad: आमिर खान, कियारा आडवाणीच्या नव्या जाहितीवरून वाद

मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांची आमिरवर टीका; भारतीय परंपरेची खिल्ली उडवल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Aamir Khan's New Ad: 'आदिपुरूष' चित्रपटाच्या टीझरवरून निर्माण झालेला वाद अजून शमलेला नसतानाच आता बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान एका जाहिरातीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आमिरवर केला जात आहे.

अभिनेता आमिर खान याने अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत एका खासगी बँकेसाठी नुकतीच एक जाहिरात केली. या जाहिरातीतून भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. यावरून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या जाहिरातीवर टीका केली आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखावू नका, असा सल्लाही त्यांनी आमिर खानला दिला आहे. या जाहिरातीला काही लोकांकडून विरोधही होऊ लागला आहे.

नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आमिर खान एका खासगी बँकेच्या जाहिरातीत लग्नानंतर गृहप्रवेश करताना दाखवला आहे. ते ज्या प्रकारे दाखवले आहे, ते भावना दुखावणारे आहे. धार्मिक परंपरा, रितींवर केलेला हा प्रहार आहे. मला याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

मी तर आमिर खान यांना सांगू इच्छितो की, ते जे कुठले चित्रपट किंवा जाहिराती करणार असतील त्यांनी भारतीय परंपरा आणि संस्कार लक्षात ठेवावे. त्यांनी असे कोणतेही काम करू नये ज्यातून कुणाच्या भावना दुखावतील. सातत्याने अशा प्रकारचे काम करून ते धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न ते करतात, जे चुकीचे आहे.

जाहिरातीत काय दाखवले आहे?

या जाहिरातीत आमिर आणि कियारा यांचे नुकतेच लग्न झाले असून ते गृहप्रवेश करताना दाखवले आहेत. तथापि, नेहमी वधु वराच्या घरी जात असते. पण या जाहिरातीत वराच्या भूमिकेत असलेला आमिर वधु कियाराच्या घरी गेलेला दाखवला आहे. कारण वधुचे वडिल आजारी आहेत. त्यातून आजारी सासऱ्यांसाठी नवराच लग्न करून बायकोच्या घरी येतो. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा का आहेत? असा सवालही या जाहिरातीत केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियातूनही या जाहिरातीवर आणि आमिरवर निशाणा साधला जात आहे. तर अनेकांकडून या जाहिरातीचे कौतूकही केले जात आहे. ट्रोलिंगवर आमिर किंवा कियारा यांची मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाही. यापुर्वी आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'चित्रपटावर बहिष्काराची मोहिम चालली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT