Bigg Boss OTT मध्ये लवकरच होणार एका नवीन कपलची एंट्री Instagram /@vootselect
मनोरंजन

Bigg Boss OTT मध्ये लवकरच होणार एका नवीन कपलची एंट्री

बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) पहिल्या रविवारी सुपर एंटरटेनमेंट (Super Entertainment) होणार जेव्हा बिग बॉसची आवडती जोडी एंट्री करणार.

दैनिक गोमन्तक

मनोरंजनासह (Entertainment) वादांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'बिग बॉस ओटीटी' शोला (Bigg (Boss OTT) नुकतीच चांगली सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी' या वेळी नव्या बदलांसह सुरू झाला आहे. या शोबाबत प्रेक्षकांमध्ये (Audience) बरीच चर्चा सुरू आहे. त्याच वेळी, या शोमध्ये पुढे काय काय होणार यावरच प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. दरम्यान आता करण जोहरने (Karan Johar) होस्ट केलेल्या या शोमध्ये दोन नवीन जोडप्याची (New couple) एंट्री (Entry) होणार आहे. मात्र त्यांचे नाव अद्याप उघड झालेले नाही. पण त्यांची एक झलक शेअर (Share) करून चाहत्यांना (Fans) ओळखण्यास सांगितले आहे.

'बिग बॉस ओटीटी' या प्रसिद्ध शोबाबत एकक नवीन बातमी समोर येत आहे. दरम्यान, वुटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत एका जोडप्याची सावली दिसत आहे. हा फोटो शेअर करत चाहत्यांना कॅप्शनमध्ये विचारले आहे की, बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या रविवारी सुपर एंटरटेनमेंट होणार जेव्हा बिग बॉसची आवडती जोडी एंट्री करणार. ती जोडी कोणती तुम्ही ओळखू शकता का?

अनेक युजर्संनी कमेंटमध्ये ही जोडी सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची असू शकते तर काहींनी हे अली गोनी आणि जस्मिन भसीन असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत या फोटोवर हजारो कमेंट्स आल्या आहेत. नवीन चेहऱ्याची उघड येत्या रविवारी होणार आहे.

यंदाचा सीझन खूप वेगळा आहे. नेहा भसीन, रिद्धिमा पंडित, करण नाथ, दिव्या अग्रवाल,राकेश बापट, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी आणि अक्षरा सिंह यांच्यासह अनेक स्पर्धक या शोमध्ये सहभागी झाले आहेत. हा शो पहिल्या 6 आठवड्यासाठी 'वुट सिलेक्टवर' सुरू झाला आहे. या शोचे होस्टिंग प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT