Indrasabha Dainik Gomantak
मनोरंजन

Film Record Since 91 Years: 211 मिनिटांचा चित्रपट अन् तब्बल 72 गाणी; 91 वर्षांनंतरही 'या' चित्रपटाचा विक्रम अबाधित

Film Record Since 91 Years: या चित्रपटामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 72 गाणी आहेत.

दैनिक गोमन्तक

Film Record Since 91 Years: चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. मात्र काही चित्रपट असे असतात ज्यांची बरोबरी कोणीच करु शकत नाही. असे काही चित्रपट ज्यांचे रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही.

बॉलीवूडमध्ये असाच एक चित्रपट आहे ज्याचे रेकॉड 90 वर्षानंतरही कोणी तोडू शकले नाही. हा चित्रपट म्हणजे 'इंद्रसभा'. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 72 गाणी आहेत. 30च्या दशकात 1932 साली रिलिज झालेल्या या चित्रपटाला आता 91 वर्षे पूर्ण झाली आहेत.

इंद्रसभा हा एकमेव असा चित्रपट आहे, त्यातील गाण्यामुळे या चित्रपटाचे रेकॉर्ड इतर कोणीही तोडू शकले नाही. या 72 गाण्यापैकी 9 ठुमरी, 31 गजल, 13 वेगवेगळी गाणी, होळीची 4 गाणी, 5 छंद, 5 चौबाला आणि बाकीचे 5 सामान्य गाणी या चित्रपटात आहेत. इतकी गाणी असलेला हा चित्रपट 211 मिनिटांचा आहे.

30 च्या दशकात प्रसिद्ध असणारे सितारे म्हणजेच जहानारा आणि मिस्टर निसार हे इंद्रसभा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून आले होते. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंद्रसभा हा पहिला ध्वनीपट असणारा चित्रपट आहे. तर 1931 ला आलेला आलमआरा हा पहिला बोलपट चित्रपट आहे.

दरम्यान, इंद्रसभानंतर चित्रपटांचा ट्रेंड बदललेला दिसून येतो. चित्रपटातील गाण्यांचे प्रमाण कमी केल्याचे पाहायला मिळते. अलिकडे चित्रपटात खूप कमी गाणी असल्याचा ट्रेंड दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT