Maharashtra Weather Updates Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather Updates: कोकण किनारपट्टीसह 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

Weather Updates: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात काही तासातच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे. तसेच कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Updates News)

16 ते 19 मे महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे पावसाची (Rain) शक्यता सांगण्यात आली आहे. तर कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने यंदा वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. तसेच आज मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने आता वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

SCROLL FOR NEXT