Working process of Konkan Railway  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकण रेल्वे प्रशासनाचा अजब कारभार; चोरी फेब्रुवारीत अन् गुन्हा...

मत्स्यगंधा एक्सप्रेस ट्रेनमध्ये गुन्हा घडला फेब्रुवारीत नोंदवला ऑक्टोबरमध्ये

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मत्स्यगंधा एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे दागिने व 2 हजार रुपये मिळून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग लंपास केल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध कोकण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर घडली होती.

कोकण रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मत्स्यगंधा एक्सप्रेस ट्रेनमधून मुंबईहून कर्नाटकला प्रवास करीत असताना, ही चोरी झाली. याप्रकरणी सरीथा सागर या महिलेने 14 ऑक्‍टोबर रोजी कोकण रेल्वे स्थानकावर येऊन तक्रार नोंद केली आहे. अज्ञात चोराने बॅगमध्ये असलेली सोन्याचे दागिने, 2 हजार रुपये व इतर साहित्य मिळून सुमारे 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, असे तक्रारीत म्‍हटले आहे. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी भा. दं. सं. च्या 379 कलमान्‍वये गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान कोईंबतूर एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा लॅपटॉप व अन्य साहित्य मिळून 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणात अज्ञात चोराविरुद्ध कोकण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

ही घटना 27 जून रोजी मडगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. तक्रारदार राजागोपालन (गुजरात) हे केरळहून गुजरातला प्रवास करत असताना ही चोरी झाली. त्‍यांनी 14 ऑक्‍टोबर रोजी कोकण रेल्‍वे पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंद केली आहे. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भा. दं. सं.च्या 379 कलमान्‍वये गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT