Finally the woman who cheated on the marriage was exposed Dainik Gomantak
महाराष्ट्र

चार लग्नं, खोट्या केसेस आणि खंडणी! लग्नाची फसवणूक करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश

Marriage Fraud Case : महाराष्ट्रातील नागपुरात एक अनोखी घटना समोर आली आहे. एक महिला आधी पुरुषांशी लग्न करायची आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून खंडणी उकळायची.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील नागपुरात एक अनोखी घटना समोर आली आहे. एक महिला आधी पुरुषांशी लग्न करायची आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून खंडणी उकळायची. यासंदर्भात पोलिसांनी आरोपी महिलेला तिच्या प्रियकरासह अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. भाविका मनवानी उर्फ ​​मेघाली दिलीप तिजारे (35) आणि तिचा प्रियकर मयूर राजू मोटघरे (27, रा. वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची माहिती नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Finally, the woman who cheated on the marriage was exposed)

पहिला विवाह 2003 मध्ये झाला होता

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे पहिले लग्न 2003 मध्ये झाले होते. त्यानंतर 2013 मध्ये दुसरे, 2016 मध्ये तिसरे आणि 2021 मध्ये चौथे लग्न केले. ती आधी लग्न करायची आणि नंतर तिच्या पतींविरुद्ध खोट्या तक्रारी करायची.

चौथ्या पतीने दिली फिर्याद

जरीपटका येथील तिचा चौथा पती महेंद्र वनवानी याच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली असून, गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी तिच्याशी विवाह झाला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने वानवानी यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून 4 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT