Raj Thackeray And Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

MNS BJP Shinde: मनसे-शिंदे-भाजपा युती होणार का? महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक पाहता महाराष्ट्रात मनसे-शिंदे-भाजपा युती होणार का?

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाढत असलेली जवळीक सर्वांनी पाहिली आहे. तसेच, नुकताच राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दीपोत्सवाला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक पाहता महाराष्ट्रात मनसे-शिंदे-भाजपा युती होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली आहे. डोंबिवलीत मनसेने दीपोत्सवाचे आयोजन केलं होतं. खासदार श्रीकांत शिंदेंचा देखील याच ठिकाणी कार्यक्रम होता. या कार्यक्रमात भाजपाचे माजी उपमहापौर राहुल दामले, मनसेचे माजी विरोधी पक्ष नेते व गटनेते प्रकाश भोईर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या मध्यवर्ती शाखेला भेट दिली. यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत आहे.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. युतीमध्ये सहभागी होणार का या प्रश्नाला उत्तर देताना मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत मोठं वक्तव्य केले आहे. आमची सर्वांची मनं जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल असं आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिलंय. त्यामुळे मनसे आणि शिंदे- भाजप युती होणार का याची पुन्हा एकदा चर्चेला उधाण आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT