Summer Special Trains  Dainik Gomantak
महाराष्ट्र

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी पश्चिम रेल्वेतर्फे मुंबईहून 6 विशेष गाड्या, बुकिंग सुरू

पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रातील वांद्रे टर्मिनस ते यूपीमधील कानपूर अनवरगंज, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर आणि सुरत ते सुभेदारगंज दरम्यान एकूण 6 उन्हाळी विशेष गाड्या (Summer Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Summer Special Trains : उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून भारतीय रेल्वे (Indian Railway) वेळोवेळी विशेष गाड्या चालवते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रातील वांद्रे टर्मिनस ते यूपीमधील कानपूर अनवरगंज, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर आणि सुरत ते सुभेदारगंज दरम्यान एकूण 6 उन्हाळी विशेष गाड्या (Summer Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Western Railway has started booking 6 special trains from Mumbai for summer vacation)

> 05054/05053 वांद्रे टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 05054 वांद्रे टर्मिनस – गोरखपूर स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर शनिवारी 19.25 वाजता सुटेल. ही ट्रेन तिसऱ्या दिवशी 06.25 वाजता गोरखपूरला पोहोचेल. ही साप्ताहिक विशेष ट्रेन 16 एप्रिल ते 25 जून 2022 या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 05053 गोरखपूर – वांद्रे टर्मिनस स्पेशल दर शुक्रवारी गोरखपूरहून 04.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी, 16.00 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.

> 09191/09192 वांद्रे टर्मिनस - कानपूर अन्वरगंज सुपरफास्ट साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 09191 वांद्रे टर्मिनस - कानपूर अनवरगंज सुपरफास्ट स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी 04.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी, कानपूर अन्वरगंजला 7.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 14 एप्रिल ते 16 जून 2022 या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09192 कानपूर अनवरगंज – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल कानपूर अनवरगंज येथून दर शुक्रवारी 08.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.

> 09117/09118 सूरत – सुभेदारगंज सुपरफास्ट साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 09117 सूरत – सुभेदारगंज सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी दर शुक्रवारी 06.00 वाजता सुरतहून सुटेल आणि सुभेदारगंजला दुसर्‍या दिवशी 08.40 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 15 एप्रिल ते 17 जून 2022 या कालावधीत धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09118 सुभेदारगंज – सुरत सुपरफास्ट स्पेशल सुभेदारगंज येथून दर शनिवारी 19.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 20.00 वाजता सुरतला पोहोचेल. ही ट्रेन 16 एप्रिल ते 18 जून 2022 पर्यंत धावणार आहे.

या सर्व उन्हाळी विशेष गाड्यांचे बुकिंग 10 एप्रिलपासून प्रवासी आरक्षण केंद्रे आणि IRCTC वेबसाइटवर सुरू झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT