Maharashtra Weather Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात पावसासह गारपिटीची शक्यता

कोकण, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. कोकण आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाच्या सारी बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसासह गारपिटी होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवला आहे.. पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सातारा, सांगली तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश या भागात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून उष्णतेची लाट सुरु आहे.

कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दर्शविला तरी, विदर्भ आणि आजूबाजूच्या भागात तापमानाचा पारा कायम असणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट कायम आहे. या भागाकडून महाराष्ट्राकडे उष्ण वारे वाहत आहेत. तर, दक्षिणेकडून महाराष्ट्राकडे दमट वारे वाहत आहेत. या परिणाम म्हणून महाराष्ट्रामधील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत 13 ते 14 एप्रिल दरम्यान या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात गारा पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली, सातारा, सोलापूरच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून आंबा, द्राक्ष फळबागांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर काही ठिकाणी वादळी वारे आणि पावसामुळं घरे पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

Gujarat ATS Drug Seizure: अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्स जप्त! इराणच्या जहाजातून 526 किलो अमलीपदार्थ, पाकिस्तानचे 5 तस्कर ताब्यात

Rohit Sharma Celebration: 35वं वनडे शतक अन् रोहित शर्माचा हटके अंदाज! खास सेलिब्रेशनचा अर्थ विचारताच हिटमॅन म्हणाला, 'हे माझ्यासाठी...' VIDEO

SCROLL FOR NEXT