दिलीप वळसे पाटील Dainik Gomantak
महाराष्ट्र

'कायदा सुव्यवस्था बिघडू न देण्यासाठी आम्ही तयार': दिलीप वळसे पाटील

तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार असे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दैनिक गोमन्तक

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेऊन सर्व पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना मशिदीवरील भोग्याच्या संदर्भात निर्देश देण्याचे निर्देश देणार असे पत्रकार परिषदामध्ये म्हणाले आहे. (Maharashtra Loudspeaker row News)

दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना बोलताना म्हणाले जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कादेशीर कारवाई होणार. तसेच त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल आणि महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.

राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकर विषयाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी रविवारी सांगितले की, देशातील मुस्लिमांनी हे समजून घेतले पाहिजे की "धर्म कायदा आणि देशाच्या वर नाही" तसेच त्यांना मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यास देखील सांगितले आहे. दरम्यान अमरावतीमध्ये सध्या दोन गटात वाद निर्माण झाल्याने तणावपूर्ण वातावरण आहे. या परिस्थितिचा अंदाज घेता आणखी कुठलाही वाद होऊ नये म्हणून या भागामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. तसेच या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सध्या दोन्ही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्रीय सुरक्षा देण्याच्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, हे तर राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षेसाठी सक्षम असून केंद्रीय सुरक्षेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवावं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT