Padma Award  Dainik Gomantak
महाराष्ट्र

राष्ट्रपती भवनात 6 महाराष्ट्रीयन दिग्गजकांचा पद्म पुरस्काराने सन्मान

दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या हस्ते महाराष्ट्रीयन दिग्गजकांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमन्तक
डॉ. अनिल कुमार राजवंशी

डॉ. अनिल कुमार राजवंशी यांचा विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदहण करण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांपासून निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या (NARI) माध्यमातून ग्रामीण विकासासाठी कार्य करत आहेत.

डॉ. भीमसेन सिंघल

डॉ. भीमसेन सिंघल यांचा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. डॉ. सिंघल यांनी मल्टीपल सेलेरोसिस आणि पार्किसन्स आजारावरील उपचारासंदर्भात केलेल्या कार्याबद्दल जागतिक मान्यता मिळाली आहे.

डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे

डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक सेवेच्या माध्यमातून कुष्ठरोगींवरील उपचारासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे.

डॉ. हिम्मतराव बावस्कर

डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार 2022 गौरव करण्यात आला आहे. सर्पदंश आणि विंचूदंशावरील उपचार आणि संशोधनासंदर्भात जागतिक मान्यता मिळाली आहे. tतसेच ते रायगडमधील गरजू लोकांना मदत करत आहे.

डॉ. सायरस पूनावाला

डॉ. सायरस पूनावाला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण 2022 पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ. पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक असून त्यांनी लस निर्मितीत आघाडीवर असलेल्या सिरमचे भारताच्या कोविड विरोधातील लढाईत मोठे योगदान दिले आहे.

एन. चंद्रशेखरन

उद्योजक आणि टाटा सन्स कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पद्मभूषण पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी गौरव करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT