Jayant Sawarkar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांनी अनेट नाटके, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे आज वयाच्या 88व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांनी अनेट नाटके, मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सावरकर यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

गेल्या 15 दिवसांपासून सावरकर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली व त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवले.

प्रेमा तुझा रंग कसा', 'कथा नव्या संसाराची', 'बदफैली', 'वरचा मजला रिकामा', 'व्यक्ती आणि वल्ली’, 'सौजन्याची ऐशी तैशी' अशी त्यांची अनेक नाटके गाजली.

सावरकर यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. "मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच ओटीटी अशा सर्व माध्यमातून आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे दुःखद निधन झाले आहे."

"त्यांच्या जाण्याने दोन पिढ्यांना जोडणारा मार्गदर्शक दूवा निखळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच सावरकर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता शक्ती देवो हीच प्रार्थना." असे ट्वीट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT