Vande Bharat Express  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Vande Bharat Express Train: मुंबईहून लवकरच धावणार 2 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, जाणून घ्या

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु करु शकतात, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Vande Bharat Express Train: मुंबईहून लवकरच दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरु होणार आहेत. यातील एक गाडी शुक्रवारी सकाळपर्यंत येथे पोहोचण्याची शक्यता आहे, तर दुसरी गाडी 6 फेब्रुवारीला आणण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु करु शकतात, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत.

एक वंदे भारत ट्रेन आज सकाळी पुणे यार्डात पोहोचली

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, "एक वंदे भारत ट्रेन आज सकाळी पुणे (Pune) यार्डात पोहोचली आणि ती आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मुंबईत पोहोचणे अपेक्षित आहे."

अशीच दुसरी ट्रेन 6 फेब्रुवारी रोजी येथे आणली जाईल. मुंबई (Mumbai) ते सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस भोर घाटमार्गे धावण्याची शक्यता आहे. (कर्जत आणि खंडाळा दरम्यान पुण्याला जाताना) आणि ट्रेन 6.35 तासांमध्ये दोन स्थानांमधील अंदाजे 455 किमी अंतर कापेल.

सर्वात कठीण रेल्वे घाट विभागांपैकी एक

मुंबई-शिर्डी सेमी-हाय-स्पीड ट्रेन थळ घाटमार्गे (मुंबईच्या बाहेरील कसारा येथे) धावेल आणि 5.25 तासात सुमारे 340 किमी अंतर कापेल. भोर आणि थळ घाट हे रेल्वे घाटातील सर्वात अवघड विभाग आहेत, त्यामुळे सध्या या घाटांमधून जाणाऱ्या सर्व गाड्या मुंबईच्या बाजूने अतिरिक्त लोकोमोटिव्हद्वारे ओढल्या जातात.

जास्त ग्रेडियंट असलेल्या भागात ट्रेनला मागून ढकलण्यासाठी अतिरिक्त लोकोमोटिव्ह वापरतात. या अतिरिक्त लोकोमोटिव्हला बँकर देखील म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT