Gavpalan Tradition Of Chindar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Gavpalan Tradition Of Chindar: घर, ग्रामपंचायत बंद करून गाव जातं पळून, काय आहे 'गावपळण' प्रथा?

कोकणात अनेक वेगवेगळ्या रुढी परंपरा पहायला मिळतात. गावपळण ही अशीच एक प्रथा आहे. ज्यात गावकरी घरदार सोडून गुराढोरांसह गावच्या वेशीबाहेर राहूट्या उभारुन राहतात

Pramod Yadav

मालवणमधील चिंदर गावचे (Chindar, Malvan) ग्रामस्थ दर तीन वर्षांनी देवाला कौल लावतात. गावपळणाचा मुहूर्त ठरतो, देवाचा कौल मिळाला की ढोल वाजायला सुरूवात होते. गावातील लहान, मोठे सर्व ग्रामस्थ एवढंच काय गाई, म्हशी यांच्यासह सर्वजण गावाच्या वेशी बाहेर जायची तयारी करतात. या काळात घर, दुकानं, शाळेसह ग्रामपंचायत देखील टाळा लावून बंद केली जाते. मागील सात ते आठ पिढ्या चिंदर गावाचे ग्रामस्थ 'गावपळण' प्रथा पाळत आहेत. चिंदर गावच्या गावपळण प्रथेला आजपासून (शुक्रवार, दि.18) सुरूवात होत आहे.

देवाचा कौल मिळाल्यानंतर गावाच्या बाहेर झोपड्या उभारल्या जातात, त्यासाठी जमीन स्वच्छ करून सारवली जाते. गावाबाहेर माळराणावर तात्पुरता निवारा उभारला जातो याकाळात शेतीचे असो किंवा दुसरे कोणतेच काम केले जात नाही. तयारीचा भाग म्हणून अगोदरपासूनच या जागेवर गवत, लाकडे गुरांसाठी चारा, पाणी याची सोय केली जाते. गावकरी रातत्रभर गाणी, भजणं, संगीतखूर्ची यासारख्या कार्यक्रमात रंगतात, तसेच महिला देखील विविध खेळ खेळतात. वर्षभर केलेल्या कामानंतर ग्रामस्थांना याकाळात निवांतपणा अनुभवायला मिळतो.

गावपळण काळात विविध खाद्यपदार्थांचे बेत ठरतात, जेवणांचे एकमेकांना वाटप केले जाते. चार दिवसांत गावातील तंटे, वाद एकमेकांशी चर्चा करून मिटवले जातात. तीन दिवस तीन रात्री खेळ खेळत, गप्पा मारत धम्माल, मज्जा मस्ती करत गावकरी घालवतात. या गावची गावपळणची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

राधानगरी तालुक्यातील मानबेट, चौके गावातही आहे गावपळण प्रथा

कोल्हापूरच्या (Kolhapur) राधानगरी तालुक्यातील मानबेट आणि चौके गावात देखील गावपळण ही प्रथा आजही पाळली जाते. रोगराई पसरली होती त्या काळात ही पावपळण प्रथा सुरू झाल्याची येथील गावकरी सांगतात. तीन, सात, नऊ किंवा 21 दिवस देखील गावाबाहेर लोक राहतात. त्यानंतर देवाकडे कौल घेतला जातो, देवानं कौल दिल्यानंतर पुन्हा गावात प्रवेश केला जातो. गावातील लोकांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य लाभावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा येथील पाळत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT