Prisoners will get loans in maharshtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचा अनोखा उपक्रम; आता कैद्यांनाही मिळणार कर्ज

कारागृहात केलेल्या कामाच्या मोबदल्यात कैद्यांना हे कर्ज दिले जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Prisoners will get loans : महाराष्ट्र सरकारने तुरुंगातील कैद्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. कारागृहात केलेल्या कामाच्या मोबदल्यात कैद्यांना हे कर्ज दिले जाणार आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जासाठी 7 टक्के व्याज आकारणार आहे.

हा निर्णय सध्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जात आहे. या योजनेचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे. कैद्यांना कर्ज देणे ही देशातील पहिलीच घटना असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. (Unique initiative of Government of Maharashtra; Now even prisoners will get loans)

जामीनदाराची गरज नाही

माहितीनुसार, या कर्जासाठी (Loan) कैद्यांना कोणत्याही जामीनदाराची गरज भासणार नाही. वैयक्तिक बाँडवर त्याचे वितरण केले जाईल. बँक कमाई, कौशल्य, रोजंदारी या आधारावर रक्कम ठरणार आहे.

1055 कैद्यांना दिलासा मिळणार

सुमारे 1055 तुरुंगातील कैद्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जातून मिळालेली रक्कम वकिलाची फी, नातेवाईकांची मदत आदींसाठी कैदी वापरू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT