Narayan Rane  Dainik Gomantak
महाराष्ट्र

बाळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता शिवसेनेत नाही : नारायण राणे

देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील 50 वर्षे भाजपची सत्ता राहील : नारायण राणे

दैनिक गोमन्तक

सावंतवाडी : येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर घणाघात केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाशी गद्दारी करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून राज्यात सत्ता उपभोगत आहेत. बाळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता आताच्या शिवसेनेत नाही, अशी टीका देखील राणे यांनी केली. (Union Minister Narayan Rane criticizes Shiv Sena)

देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील 50 वर्षे भाजपची सत्ता कायम राहील, असा ठाम विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग गावासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार फंडातून दिलेल्या एक कोटी रुपये खर्चाच्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर आदी उपस्थित होते. राणे कुटुंबीय शिवसेनेवर सातत्याने टीका करता असतात. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पावसाळ्यात मुंबईत साठणाऱ्या पाण्याबाबत चिंता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT