Uddhav Thackeray on Fadnavis Danik Gomantak
महाराष्ट्र

देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, उद्धव ठाकरेंचा घणाघात

हिंदुत्व हे काय धोतर आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल

दैनिक गोमन्तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यात गेल्या महिन्याभरात घेतलेल्या तीन सभांच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभा घेत असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार? याविषयी मोठी चर्चा सुरू होती. (uddhav thackeray on devendra fadnavis)

दरम्यान, यावेळी बोलताना ते म्हणाले की, देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती. असा टोला यावेळी त्यांनी बोलताना लगावला. तसेच हनुमान चालिसा, भोंगे वाले ही यांची ए, बी, सी टीम आहे. आमचं हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आम्ही उघडपणे राष्ट्रवादी आणि शिवेसेनेसोबत गेलो.

गेल्यावेळेस त्यांनी भगव्या टोप्या घातल्या. विचारलं की का घातली, तर म्हणे हिंदुत्व ना. अरे हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं, मेंदुत असतं. या गर्दीमध्ये जीवंतपणा आहे. सर्व वाघ आहेत वाघ. अस म्हणत शिवसैनिकांचे काैतुक केले. तसेच मुंबईमध्ये जी काम आपण करतो, ती आपण अभिमानाने सांगितली पाहिजेत. सीबीएसई सारख्या बोर्डचे शिक्षण पालिका शाळांत दिले जाते. पूर्वी पालिकेच्या शाळांत जातो सांगायला थोडी लाज वाटत असे, आता जाऊन पहा, प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली.

शिवसेनेची मुंबईमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेले होते. या सभेसाठी मंचावर शिवसेने प्रमुख नेते उपस्थीत आहेत. यामध्ये संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अरविंद सावंत, उदय सामंत, विनायक राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, आदेश बांदेकर, मंचावर उपस्थित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT