Shivsena Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shivsena: शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज होणार सुनावणी

Shivsena: आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे व लेखी युक्तीवाद सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत यावर निर्णय दिला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Shivsena: शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट अशी फूट पडल्यापासून वाद विवाद सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, शिवसेना कोणत्या गटाची आणि शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे यावरुन आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत.

शिवसेना आणि धनुष्यबाण आपले असल्याचा दावा करत ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी धाव घेतली.

आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे व लेखी युक्तीवाद सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत यावर निर्णय दिला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या आधी 20 जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी झाली होती.

त्यावेळी दोन्ही गटांना 23 जानेवारी पर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. तसेच पुढील सुनीवणीसाठी 30 जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालया( Supreme-Court)त देखील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी ही येत्या 14 फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान शिवसेना( Shivsena ) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT