Mumbai-Goa Highway Bus Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर दोन बसची धडक; दोन्ही ड्रायव्हरसह 15 प्रवासी जखमी

वाहतूक काहीकाळ विस्कळीत

Akshay Nirmale

Mumbai-Goa Highway Bus Accident: मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळ दोन बसचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या दोन्ही बसच्या चालकांसह १५ प्रवासी या अपघातात जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यातील जखमींना जवळच्या रूग्णालयता उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अपघात कसा घडला याविषयी काहीही माहिती समोर आलेले नाही.

मुंबई-गोवा हा सर्वाधिक रहदारी आणि व्यस्त असलेला महामार्ग आहे. या अपघाताचे कारण समोर आलेले नाही. अचानक झालेल्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून रूग्णालयात नेले.

जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावरील एका लेनवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काही काळ येथील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT