Taragiri  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Taragiri : भारतीय नौदलात ‘तारागिरी’ युद्धनौका दाखल, जाणून घ्या वैशिष्ट्य

Taragiri: भारतीय नौदलाच्या सेवेत तारागिरी युद्धनौकेची एन्ट्री झाली असून भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय नौदलाच्या सेवेत तारागिरी युद्धनौकेची एन्ट्री झाली आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे रविवारी प्रकल्प 17 ए मधील तिसरी युद्धनौका 'तारागिरी' चे जलावतरण करण्यात आले. 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्प 17A कार्यक्रमांतर्गत सात युद्धनौका बांधण्यात येणार आहेत. यातील चार युद्धनौका एमडीएल आणि तीन गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) सुधारित स्टिल्थ वैशिष्ट्यांसह बांधण्यात येणार आहेत. अशी माहिती माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांनी दिली आहे.

तारागिरी (Taragiri) ही युद्धनौका एकात्मिक बांधणी पद्धत वापरून बांधण्यात आली आहे. यामध्ये विविध भौगोलिक ठिकाणी नौकेच्या प्रमुख भागाचे बांधकाम आणि एमडीएल येथे एकत्रीकरण/बसवणे यांचा समावेश आहे. तारागिरीची पायाभरणी 10 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. तसेच ऑगस्ट 2025 पर्यंत ती नौदलाकडे सुपूर्द होणे अपेक्षित आहे. या युद्धनौकेचे आरेखन भारतीय नौदलाच्या अंतर्गत असलेल्या नौदल (Navy) डिझाइन ब्युरो या आरेखन संस्थेने केले आहे. युद्धनौका पर्यवेक्षण पथकाच्या देखरेखीखाली एमडीएल विस्तृत आरेखन आणि बांधणी करत आहे.

युद्धनौकांना डोंगररांगांची नावे

प्रकल्प 17A अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सर्व युद्धनौकांना भारतातील डोंगररांगांची नावे देण्यात आली आहेत. 'तारागिरी' हे नाव उत्तराखंडमध्ये असलेल्या हिमालयातील गढवाल येथील टेकडीवरून ठेवण्यात आले आहे.

‘तारागिरी’ युद्धनौकेची वैशिष्ट्ये

तारागिरी’ युद्धनौका ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. तारागिरी या युद्धनौकेचे वजन 3510 टन असून तिची रचना भारतीय नौदलाच्या इन-हाउस ब्युरो ऑफ नेव्हल डिझाईनने केली आहे. 149 मीटर लांब आणि 17.8 मीटर रुंद जहाज दोन गॅस टर्बाइन्स आणि दोन मुख्य डिझेल इंजिनच्या संयोजनाद्वारे समर्थित असेल. याचा टॉप स्पीड 28 नॉट्स असेल. ही नौका ताशी 59 किमी वेगाने समुद्राच्या लाटांना भेदून धावू शकती. या स्वदेशी युद्धनौकेवर 35 अधिकाऱ्यांसह 150 लोक तैनात केले जाऊ शकतात.

तारागिरी ही युद्धनौका एक स्वदेशी बनावटीची असून यामधून अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स, प्रगत कृती माहिती प्रणाली, एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली, जागतिक दर्जाची मॉड्यूलर निवास व्यवस्था, वीज वितरण प्रणाली आणि इतर अनेक प्रगत सुविधा असतील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT