Elon Musk Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने एलन मस्कला दिली मोठी ऑफर: 'तुम्ही आमच्या राज्यात या अन्...

महाराष्ट्र सरकारचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राकडून सर्वतोपरी मदत करु.

दैनिक गोमन्तक

भारत सरकारबरोबर सुरु असलेल्या चर्चेच्या फेऱ्यानंतर टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना महाराष्ट्र सरकारच्या एका मंत्र्याने मोठी ऑफर दिली आहे. किंबहुना, महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक असल्याचे महाराष्ट्र सरकारचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राकडून सर्वतोपरी मदत करु. आम्‍ही तुम्‍हाला मॅन्युफॅक्चरिंग प्‍लांट महाराष्ट्रात (Maharashtra) स्‍थापित करण्‍यासाठी आमंत्रित करतो.

मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याचे आमंत्रण मिळाले

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक असल्याचे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. भारतात (India) स्थापन होण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ. आम्‍ही तुम्‍हाला तुमचा उत्‍पादन कारखाना महाराष्ट्रात स्‍थापित करण्‍यासाठी आमंत्रित करतो. एलन मस्क यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

एलन मस्क यांना भारत सरकार यांच्यात चर्चा सुरु

वास्तविक, 12 जानेवारीला टेस्लाचे (Tesla) सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांना ट्विटरवर एका यूजरने विचारले की, टेस्ला भारतात कधी येणार आहे? प्रत्युत्तरादाखल ते म्हणाले होते की, भारत सरकारबरोबर आमची चर्चा सुरु आहे. मस्क यांच्या या ट्विटला उत्तर देताना तेलंगणाचे उद्योगमंत्री सर्वप्रथम पुढे आले. तेलंगणाला (Telangana) भारतात टेस्लाची स्थापना करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कंपनीसोबत भागीदारी करण्यासाठी तयार आहोत, असं त्यांनी यावेळी म्हटले आहे.

मस्कने 2020 मध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची घोषणा केली

मस्क म्हणाले की, 2020 मध्ये टेस्ला भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक उत्पादन युनिट स्थापन करेल. India Motors & Energy Pvt Ltd नावाची टेस्ला उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे. कंपनी बंगलोर बाहेर स्थित आहे.

भारतातील कर जगातील इतर देशांपेक्षा जास्त: टेस्ला

टेस्लाला या वर्षी देशात त्‍याच्‍या इम्पोर्टेड कारची विक्री करायची आहे, परंतु कंपनीचे म्हणणे आहे की, भारतातील कर उर्वरित जगापेक्षा जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT