Winter Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; हवामान विभागाचा इशारा

येणाऱ्या पाच दिवसांत 3 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता...

दैनिक गोमन्तक

राज्यात सध्या थंडीचा कडाका जास्त वाढला आहे. दिवसेंदिवस तापमान कमी जास्त होत आहे. असे असले तरी थंडीचे प्रमाण मात्र कमी नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये हा पारा आणखी खाली घसरणार आहे. त्यामुळे राज्यात अजून थंडीची लाट येणार असल्याचा हवामान (Weather) विभागाने सांगितला आहे. तसेच देशातल्या तापमानात सुध्दा मोठी घट होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे आहे.

हवामान विभागाने (Meteorological Department) केलेल्या ट्विट च्या माध्यामातून, येणाऱ्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात किमान तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर 25 आणि 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामानातील बदलामुळे राज्यावर धूळीचे मळभ

हवामानात अचानक पणे मोठा बदल झाला त्यामुळे रविवारी राज्याच्या बहुतांश भागात धूळ आणि धुक्याचे वातावरण (climate)होते. राज्यात वाढलेली आर्द्रता आणि धूळ आणि वाढवणाऱ्या वेगवान वाऱ्याच्या एकत्रित परिणामामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे. ही स्थिती विशेषता उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवली, तर सौराष्ट्राकडून आलेल्या धूलीकणाच्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबई पुणे भागात हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT